ETV Bharat / entertainment

kartik aaryan : काश्मीरच्या बर्फाळ नदीत स्नान करताना कुडकुडतोय कार्तिक आर्यन; पाहा व्हिडिओ... - आईस बाथ व्हिडिओ व्हायरल

kartik aaryan : कार्तिक आर्यन 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या कार्तिकचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक नदीत स्नान करताना दिसत आहे.

kartik aaryan
कार्तिक आर्यन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 4:36 PM IST

मुंबई Kartik Aaryan : कार्तिक आर्यन हा लवकरच 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात दिसणार आहे. कार्तिक आज बी-टाऊनचा लोकप्रिय स्टार आहे. कार्तिकचं फिल्मी बॅकग्राऊंड नसतानाही त्यानं आपल्या दमदार अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता कार्तिक आर्यनचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पहिल्यांदाच काश्मीरमध्ये बर्फाळ नदीत स्नान करताना दिसत आहे. कार्तिकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो काश्मीरमधील बर्फाळ नदीत स्नान करताना दिसत आहे. आंधोळ करताना त्याचे हात खूप थरथर कापत आहेत. थंडीनं तो अक्षरशः कुडकुडतोय. या व्हिडिओमध्ये त्यानं हातावर काळ्या रंगाची पट्टी बांधलेली दिसत आहे. यासोबतच त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे अ‍ॅक्शन शेड्यूलही पूर्ण झाल्याचं समजत आहे.

कार्तिक आर्यनचा व्हिडिओ झाला व्हायरल : कार्तिकचा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. चित्रपट निर्माते कबीर खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कार्तिकचा व्हिडिओ पाहून अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत व्हिडिओवर लिहिलं, 'तुझ्यासारखा कोणीच बॉलिवूडमध्ये स्टार नाही. कार्तिक तुझा हा चित्रपट खूप जबरदस्त हिट होईल'. दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, 'भाऊ पाणी तर खूप हॉट झालं आहे'. आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप खास दिसत आहे'. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय अनेकजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत या व्हिडिओला लाईक करत आहेत.

वर्कफ्रंट : चंदू चम्पियन या चित्रपटाचं काही शूटिंग हे लंडनमध्ये करण्यात आलं आहे. साजिद नाडियादवालाच्या या चित्रपटाची शूटिंग काश्मीरमध्ये देखील होणार आहे. याआधी साजिदनं 'हायवे', 'हिरोपंती', 'फँटम' आणि कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचं शूटिंग देखील याठिकाणी केलं आहे. 'चंदू चॅम्पियन' 2024 मध्ये रिलीज होणार आहे. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्या सोबत कियारा अडवाणी होती. साजिद नाडियादवाला 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट एका खेळाडूच्या जीवनावर आधारित आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील कार्तिकचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला होता. हा लूक अनेकजणांना आवडला होता.

हेही वाचा :

  1. LEO Movie : थलपथी विजय स्टारर 'लिओ'नं मोडला 'पोनियिन सेल्वन पार्ट 1'चा विक्रम....
  2. Box Office King SRK : 'पठाण आणि जवान'मुळे शाहरुख खान बनला बॉक्स ऑफिसचा किंग
  3. Nayanthara and Vignesh shivan : नयनतारा आणि विघ्नेश शिवननं केलं ब्युटी ब्रँड लॉन्च; फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.