मुंबई : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे स्टार्स चमकले आहेत. चित्रपट दिग्दर्शक अनीस बज्मीच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने सिद्ध केले की दिग्दर्शक जरी चित्रपट बनवत असले तरी केवळ प्रेक्षकच कलाकारांना यशस्वी करतात. असेच काहीसे कार्तिक आणि त्याच्या चित्रपटाबाबत घडले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कार्तिक आर्यन स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 2' देशभरात जवळपास 3200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. वर्षातील सर्वात मोठ्या पहिल्या वीकेंडचा विक्रम कार्तिकने केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी इंस्टाग्रामवर कार्तिकच्या वीकेंडचे वर्णन केले.
त्यांनी पोस्ट शेअर केली आणि लिहिले 'भूल भुलैया-2' ही 55 कोटी प्लससह मोठी उपलब्धी आहे. चित्रपटाचे यश हे आजारी उद्योगाच्या फुफ्फुसात ऑक्सिजन भरण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने शुक्रवारी 14.11 कोटी, शनिवारी 18.34 कोटी, रविवारी 23.51 कोटी, तर आतापर्यंत एकूण 55.96 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मनोरंजनाने भरलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक कुटुंबासह चित्रपटगृहात आपली जागा बुक करत आहेत. 2007 मध्ये अक्षय कुमार स्टारर 'भूल भुलैया' रिलीज झाला होता. या चित्रपटाचा पहिला भागही प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता या चित्रपटाची फ्रेंचाइजी 'भूल भुलैया 2' रिलीज झाली आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय चित्रपटात संजय मिश्रा, तब्बू, राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा - Cannes 2022: धुराच्या ग्रेनेडसह रेड कार्पेटवर महिलांचे आंदोलन