ETV Bharat / entertainment

Kareena Kapoor :विमानतळावर नो-मेकअप लूकमध्ये झक्कास दिसली करीना कपूर - नो मेकअप लूक

करीना कपूर खान पापाराझींने सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर स्पॉट केले. यावेळी ती नो-मेकअप लूकमध्ये दिसली होती. या लूकमध्ये करीना ही फार देखणी दिसत होती.

Kareena Kapoor
करीना कपूर खान
author img

By

Published : May 30, 2023, 3:10 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर पापाराझींनी स्पॉट केले. करीना ही एफ1 ग्रँड प्रिक्ससाठी मोनॅकोला गेलेली होती. तिने नेहमीप्रमाणे दाखवून दिले आहे की ती फॅशनमध्ये कुठेच कमी पडत नाही. भारतात परत येताना तिने प्यूमाचा पांढरा जॉगर्स आणि पांढरा स्वेटशर्ट परिधान केला होता. तसेच पापाराझींनी तिला स्पॉट केल्यानंतर तिचा व्हिडिओ हा त्यांच्या अकाऊंटद्वारे त्यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती स्नीकर्स आणि काळ्या रंगाच्या सनग्लासमध्ये दिसत आहे. तसेच तिच्या हातात एक हँडबॅग आहे. करीनाने यासाठी नो-मेकअप लूक निवडला असून तिने केस बनमध्ये बांधले आहे. शिवाय यावेळी ती फार सुंदर दिसत आहे.

विमातळावरील बेबोचा लूक : तिचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या विमानतळावरील लुकवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने 'फायर बेबो' अशी कमेंट केली. दुसर्‍या वापरकर्त्याने 'बूमबॅस्टिक' अशी कमेंट दिली. आणखी एका युजरने कमेंट करत लिहले, 'मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे.' इतर वापरकर्त्यांनी तिच्यावर लाल हृदय आणि फायर इमोजींचा वर्षाव केला आहे.

आगामी चित्रपट : दरम्यान, करीना कपूर खान लवकरच सुजॉय घोष दिग्दर्शित आगामी चित्रपटात झळकणार आहे. ती या चित्रपटाद्वारे डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. हा चित्रपट 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या जपानी बेस्ट सेलर पुस्तकावर आधारित असणार आहे. तसेच या चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झाले आहे. लवकरच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. शिवाय या चित्रपटाचे अद्याप शीर्षक ठरले नाही आहे. या चित्रपटाची कहाणी ही एका खुनाच्या रहस्याभोवती फिरणारी आहे. तसेच करिना ही क्राइम ड्रामा असलेल्या चित्रपटात तब्बू, क्रिती सेनन आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत आगामी चित्रपट 'द क्रू'मध्ये झळकणार आहे. याशिवाय हा चित्रपट प्रेक्षकांनी किती पसंत पडणार हे येणाऱ्या काळात समेजल.

हेही वाचा : Box office collection: मल्याळम चित्रपट '2018 एव्हरी इज ए हिरो'ने रचला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.