ETV Bharat / entertainment

Kareena Kapoor : 'अवनी बाजीराव सिंघम'च्या भूमिकेत करीना कपूर खान, 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 5:31 PM IST

Kareena Kapoor : 'सिंघम अगेन'मधील करीना कपूर खानचं फर्स्ट लूक समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये ती अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये अजय देवगणसोबतच्या चित्रपटांबद्दल तिनं उल्लेख केला आहे.

Kareena Kapoor
करीना कपूर

मुंबई - Kareena Kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुप्रतीक्षित 'सिंघम अगेन'बाबत पुन्हा एकदा अपडेट समोर आली आहे. अलीकडेच 'सिंघम अगेन'मधील पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण लेडी कॉपच्या भूमिकेत दिसली होती. दरम्यान आता या चित्रपटामधील आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये करीना कपूर खान दिसत आहे. फोटोमध्ये ती हातात एक बंदूक पकडून आहे. याशिवाय तिच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत आहेत. हा फोटो शेअर करत करीना पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'वेळ आली आहे पोलीस दलात पुन्हा सामील होण्याची. सिंघमच्या पाठीमागे असलेली ताकद पाहा. अवनी बाजीराव सिंघम. आम्ही पहिल्यांदा 2007 मध्ये एकत्र काम केले होते. आतापर्यंत 3 ब्लॉकबस्टर चित्रपट 'गोलमाल रिटर्न्स', 'गोलमाल 3' 'सिंघम रिटर्न्स' आणि आता आम्ही आमच्या चौथ्या प्रोजेक्टवर काम करत आहे 'सिंघम अगेन'. 16 वर्षांचा सहवास, काहीही बदलले नाही. बेबो अजूनही तशीच आहे, साधी, गोड आणि मेहनती'.

करीना कपूरच्या पोस्टवर आल्या कमेंट : करीना कपूरनं शेअर केलेल्या पोस्टरवर अनेकजण कमेंट करून तिचे कौतुक करत आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहलं , 'किती सुंदर पोस्टर आहे. मी नक्की हा चित्रपट पाहणार आहे'. दुसऱ्या चाहत्यानं म्हटलं, 'मी आता प्रतीक्षा करू शकत नाही' आणखी एकानं लिहलं, 'हा चित्रपट खूप जबरदस्त असणार आहे' याशिवाय काहीजणांनी या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. आतापर्यंत निर्माता रोहित शेट्टीनं 'सिंघम अगेन'मधून दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंग यांचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता.

सिंघम पुन्हा कधी रिलीज होणार? : सिंघम फ्रँचायझीचे चाहते अजय देवगणच्या फर्स्ट लूकची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या इतर स्टारकास्टमध्ये विकी कौशलचं देखील नाव समोर आलं आहे. 'सिंघम अगेन' 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' देखील याच दिवशी रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' आणि 'पुष्पा 2'मध्ये टक्कर होताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Prabhas : प्रभास गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून इटलीहून मायदेशी परतला
  2. Ranbir Kapoor Animal : 'अ‍ॅनिमल'ला अमेरिकेत मिळाल्या 'इतक्या' स्क्रीन्स, 'जवान'लाही टाकले मागे
  3. Ira Khan pre-wedding ceremony : आमिर खानची मुलगी आयरा खाननं प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो केले शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.