मुंबई : 'रेफ्युजी' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी करीना कपूर आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. हा चित्रपट 2000मध्ये रूपेरी पडद्यावर आला होता, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. या चित्रपटानंतर बेबोला 'मुझे कुछ कहना है' (2001), 'अजनबी' (2001), 'कभी खुशी, कभी गम' (2001), 'ऐतराज' (2004), यांसारखे चित्रपट ऑफर झाले. या चित्रपटात तिने चांगला अभिनय केला. त्यानंतर तिने 'जब वी मेट' (2007), '3 इडियट्स' (2009) सह अनेक हिट-सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. आज ३० जून रोजी बेबोला कॅमेऱ्याचा सामना करून २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा खास क्षण तिने तिच्या चाहत्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे.
करीना कपूरला फिल्म इंडस्ट्रीत 23 वर्षे पूर्ण : फिल्म इंडस्ट्रीत 23 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल करीना कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर टीबीएम सेटचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत बेबोने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज कॅमेऱ्यासमोर माझा जन्म होऊन 23 वर्षे झाली आहेत, आणि अजून २३ वर्षे बाकी आहेत. टीबीएम शूट'. करिनाच्या या पोस्टवर तिची बहीण-अभिनेत्री करिश्मा कपूर, बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, नेहा धुपिया, रिद्धिमा कपूर आणि झोया अख्तर यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर विजय वर्माने प्रतिक्रिया देत अभिनंदन करत लिहले , बेबोजी खूप खूप अभिनंदन. तु सर्वोत्तम आहेस. या फोटोत तिचा अर्धा चेहरा क्लॅपबोर्डच्या मागे लपलेला दिसत आहे. करिनाने 2000 साली 'रिफ्युजी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जेपी दत्ता दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत होता. बेबोने इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले आहे, ज्यावर तिने रेड हार्ट इमोटिकॉन जोडला आहे.
करीना कपूरचा वर्कफ्रंट: 'द क्रू' या चित्रपटात करीना तब्बू आणि क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या पुस्तकावर आधारित सुजॉय घोषचा पुढचा थ्रिलर चित्रपटही तिच्याकडे आहे. यात विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा :