मुंबई - karan singh grover : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहे. दरम्यान सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हरचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर करणचं या चित्रपटामधील पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये करण हा पायलेटच्या गणवेशात दिसत आहे. त्याचा हा लूक खूप खास दिसत आहे. दीपिकानं शेअर केलेल्या या पोस्टवर तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''करण चित्रपटात स्क्वाड्रन लीडर सरताज गिलची भूमिका साकारणार आहे''.
दीपिकानं शेअर केली पोस्ट : दीपिकाच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, ''करण हा खूप देखणा दिसत आहे''. दुसऱ्या एकानं लिहिल, ''हा चित्रपट लवकर प्रदर्शित झाला पाहिजे, मी वाट पाहू शकत नाही''. आणखी एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, ''करण पुन्हा एकदा पडद्यावर परत आला आहे, खूप सुंदर''. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. याशिवाय करणच्या फर्स्ट लूक पोस्टरवर पत्नी बिपाशा बसूनं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं करणचा फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर तिनं लिहिलं, 'आमचा देखणा फायटर ताज''. बऱ्याच दिवसांनी करणचे चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी आतुर होते. अलीकडेच, 'फायटर'चा टीझर देखील रिलीज झाला होता. या टीझरचं शाहरुख खान आणि अर्जुन कपूरसह बी-टाऊन सेलिब्रिटींनी खूप कौतुक केलं होतं.
'फायटर' चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि वायाकॉम18 निर्मित, या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, करण सिंग ग्रोव्हर व्यतिरिक्त अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय, तलत अझीझ आणि इतर कलाकार दिसणार आहेत. सिद्धार्थ आणि हृतिकचा एकत्र तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी 'बँग बँग' आणि 'वॉर' चित्रपटमध्ये यांनी एकत्र काम केलं होतं. 'फायटर'द्वारे पहिल्यांदा हृतिक आणि दीपिका एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'फायटर' 25 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
हेही वाचा :