मुंबई - करण जोहर ( Karan Johar ) भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. त्याचा लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करणचा ( Koffee With Karan ) सातवा सीझन डिस्ने हॉटस्टारवर सुरू झाला आहे. या शोमध्ये बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार आपले मन मोकळे करतात आणि करणने विचारलेल्या खोचक प्रश्नांना उत्तर देताना कधी चाचपडतात तर कधी बिनधास्त व्यक्त होतात. सध्या सुरू असलेल्या या शोमध्ये बरेच नवीन बदल करण्यात आल्याचे धर्मा प्रॉडक्शनचे प्रमुख-होन्चो यांनी सांगितले.
या शोमधील विधाने अनेक वेळा गाजली आहेत, त्यावर वादविवादही झाले आहेत. याबद्दल करण जोहरला प्रश्न करण्यात आला होता की, या शोमुळे कधी अडचणी आला होता का? याचे उत्तर त्याने ‘हो’ असे दिले.
"अनेकदा असे घडले आहे की, रॅपिड फायरनंतर मला दोन वेळा आग विझवावी लागली. मला आठवते जेव्हा सोनम आणि दीपिका शोमध्ये आल्या होत्या आणि त्यांना जे काही बोलायचे ते त्या बोलल्या, यातून रणबीर कपूरचा अपमान झाला. तेव्हा चिंटू जी (ऋषी कपूर) खूप नाराज झाले होते. आणखी एका प्रसंगात दोन क्रिकेटर्सनी केलेल्या विधानानंतर गोष्टी सुरळीत करण्यासाठी मी पाऊले टाकली. मी शो बंद केला आणि ऑफ एअर व्हावे लागले, हे करताना मला खूप भयंकर वाटले होते,'' असे करण जोहर म्हणाला.
इतकेच नाही तर करणने अनेकवेळा शोमध्ये जे बोलले गेले त्यावर कात्री चालवली आहे. शोमध्ये व्यक्त केलेल्या मतांमुळे वाद होऊ नयेत याची तो काळजी घेतो. याचा खुलासा करताना तो म्हणाला, "माझ्याकडे असे घडले आहे की मी टेलिकास्टपूर्वी सेलिब्रिटींनी केलेल्या कमेंट्स एडिट केल्या आहेत. कारण मला माहिती होते की यामुळे ते अडचणीत येऊ शकतात. अनेक वेळा अभिनेत्यांनी मला थेट कॉल करून काहीतरी कट करण्याची विनंती केली आहे. जीभ घसरली म्हणून सांगितले आहे. मी हे केले आहे कारण माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीच्या आधी नाती येतात."
शोमध्ये कॅमेर्यासमोर अनेक प्रतिष्ठित क्षण उलगडताना दिसले आहेत परंतु, करण जोहरसाठी सर्वात आवडता भाग राहिला आहे, "ज्यात ऋषी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर आणि नीतूजी शोमध्ये सहभागी झाले होते". शो होस्ट आणि कपूर खानदानचा कौटुंबिक मित्र म्हणून चित्रपट निर्मात्याने त्याचे वर्णन एक भावनिक क्षण म्हणून केले आहे.
हेही वाचा - निळू फुले स्मृतिदिन : पडद्यावर दहशत निर्माण करणारा हळव्या मनाचा सज्जन माणूस