ETV Bharat / entertainment

Jug Jug Jiyo sequel : 'जुग जुग जिओ'चा सीक्वेल करण्याचे करण जोहरने दिले संकेत

वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या 'जुग जुग जिओ' हा चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष होऊन पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने चित्रपट निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर या चित्रपटाचा सीक्वेल काढण्याचे संकेत दिले आहेत.

जुग जुग जिओ सीक्वेल
Jug Jug Jiyo sequel
author img

By

Published : Jun 24, 2023, 6:47 PM IST

मुंबई: नुकतेच वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने चित्रपटाचा निर्माता करण जोहरने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये 'जुग जुग जिओ'चा सीक्वेल हा रूपेरी पडद्यावर येवू शकतो असा इशारा दिला गेला आहे. चित्रपटाची एक झलक शेअर करताना करणने लिहिले की, ' एक चित्रपट ज्याबद्दल मला माहित आहे, ज्याच्या सीक्वेलची प्रेक्षक वाट पाहत आहेत.

जुग जुग जिओ सीक्वेल : जुग जुग जिओ गेल्या वर्षी २४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी स्टारर हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट होता, जो 2 विवाहित जोडप्यांभोवती फिरतो. ज्यांना त्यांच्या नात्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. ज्यावर करण जोहरने चित्रपटाची आठवण करून देणारा एक व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन देत लिहिले, 'मला माहित आहे की चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतीक्षा केली जात आहे'. यावरून असे लक्षात येत आहे की, या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची योजना आखली जात आहे.

'जुग जुग जिओ'ला १ वर्ष पूर्ण : धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटने जुग जुग जिओला १ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणारी एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एक मनोरंजन ज्याने तुम्हाला समजले की कुटुंबात सर्व काही परिपूर्ण नसते आणि ते त्याचे सौंदर्य आहे. यासह या व्हिडिओत उत्कृष्ट गाण्यांवर नृत्य केले गेले आणि प्रेमाच्या शक्तीबद्दल सांगितल्या गेले आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाद्वारे करण जोहर 7 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर दिग्दर्शकाच्या भूमिकेत परतला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Tamannaah first onscreen kiss : तमन्ना भाटियाने तोडली नो किस पॉलिसी, विजय वर्माची भन्नाट प्रतिक्रिया
  2. Vijay and Rashmika dinner date: ब्रेकअपची चर्चा असताना विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्नाची डिनर डेट
  3. Vijay and Rashmika dinner date: ब्रेकअपची चर्चा असताना विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्नाची डिनर डेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.