ETV Bharat / entertainment

Yodha Movie : सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा' चित्रपटाची रिलीज तारीख पुन्हा एकदा बदलली, वाचा काय आहे कारण... - सिद्धार्थ मल्होत्राचा योधा चित्रपट

Yodha Movie : सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' चित्रपट हा डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ हा अ‍ॅक्शनमोडमध्ये रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. याची रिलीज तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

Yodha Movie
योधा चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 1:01 PM IST

मुंबई - Yodha Movie : बॉलिवूडमध्ये रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपट यंदाच्या वर्षी प्रदर्शित झाले. काही चित्रपट आता रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या रिलीजची तारीख बदलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची डेट बदलण्यात आली होती. दरम्यान आता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा बदलल्याची बातमी समोर आली आहे. यापूर्वी हा चित्रपट 15 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार होता. याशिवाय हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी देखील रिलीज होणार होता. मात्र आता 'योद्धा'ला प्रदर्शनाची नवी तारीख मिळाली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पटानी आणि राशी खन्ना स्टारर 'योद्धा' चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा...

'योद्धा' कधी होणार रिलीज : 'योद्धा' चित्रपटाची बऱ्याचं दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान आता हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा व्यतिरिक्त दिशा पटानी, राशी खन्ना, सॅमी जोनास हीनी, अमित सिंग ठाकूर आणि योद्धा कर्नल रवी शर्मा हे कलाकर दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ हा अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दरम्यान आता कतरिना कैफ आणि विजय सेटपुट्टी स्टारर 'मेरी क्रिसमस'ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपटही 8 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

'योद्धा' चित्रपटाबद्दल : 'योद्धा' हा चित्रपट पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी मिळून बनवला आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे. डिसेंबर महिन्यात रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' आणि विकी कौशलचा 'सॅम बहादूर' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहेत. आता सिद्धार्थच्या चाहत्यांना या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर तो सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडिया पोलिस फोर्स' शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून त्याच्यासोबत विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी देखील पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. सिद्धार्थ मल्होत्रा हा शेवटी 'मिशन मजनू' या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटामध्ये दिसला होता. 'मिशन मजनू'मध्ये तो साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत झळकला होता.

हेही वाचा :

  1. Hrithik Roshan : 'हू इज युअर गायनेक' या वेब सीरिजसाठी हृतिक रोशननं केलं गर्लफ्रेंड सबा आझादचं कौतुक...
  2. Aishwarya Rai Bachchan : माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननं केला पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक; युजर्सनं केलं ट्रोल...
  3. Actor Vivek Oberoi Fraud Case : अभिनेता विवेक ओबेरॉयला दीड कोटींचा गंडा; आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.