मुंबई - Kartik Aaryan Birthday : अभिनेता कार्तिक आर्यन आज 22 नोव्हेंबरला त्याचा 33वा वाढदिवस साजरा करतोय. या खास प्रसंगी, त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान कार्तिक आर्यननंही त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठी भेट दिलीय. कार्तिक आर्यनच्या नवीन चित्रपटाची घोषणा त्याच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलीय. या चित्रपटाची निर्मीती करण जोहर आणि एमी पुरस्कार विजेती एकता कपूर करणार आहेत. करण जोहरवर कार्तिक आर्यनला 'दोस्ताना 2' चित्रपटातून बाहेर काढले असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. कार्तिकसोबत चित्रपटाची घोषणा करताना करण आनंदी आहे.
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट : आता करण जोहरनं अखेर कार्तिक आर्यनसोबतच्या त्याच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. करण जोहरनं आज 22 नोव्हेंबर रोजी त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहलं, 'या खास दिवशी, मी एका खास बातमीनं दिवसाची सुरुवात करत आहे, मला हे जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे की, धर्मा प्रोडक्शन आणि बालाजीमोशन पिक्चर्स एका चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. संदीप मोदी दिग्दर्शित हा चित्रपट असेल आणि मला हे जाहीर करतानाही अभिमान वाटतो की, आम्ही या चित्रपटासाठी सर्वात प्रतिभावान अभिनेता कार्तिक आर्यनची निवड केली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
करण जोहरनं कार्तिकला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : कार्तिक आर्यनला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, करण जोहरनं लिहलं, 'कार्तिक... तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...आपली एकजूट अशीच वाढत राहो आणि मोठ्या पडद्यावर तू अशीच जादू निर्माण करत राहो ही प्रार्थना मी करतो. यानंतर करणनं एकता कपूरसाठी लिहलं, 'तुझा मैत्र बनणे सोपे आहे, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मी तुझ्यासोबत काम करणार आहे'. कार्तिक आर्यन सध्या कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' या आगामी चित्रपटामुळं चर्चेत आहे. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :