बंगळूरू - कन्नड अभिनेता चेतन कुमारला राजकीय ट्विट करणे महागात पडले आहे. हिंदुत्वावर ट्विट केल्यामुळे बंगळूरू पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चेतन कुमार अहिंसाने आपल्या ट्विटरवर जे लिहिले त्यातून तणाव निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. त्याने हिंदूत्व हे खोट्या गोष्टींवर आधारित असल्याचे ट्विट केले होते.
चेतन कुमार अहिंसाने ट्विटमध्ये लिहिले होते की, हिंदुत्व हे खोटेपणावर बांधलेले आहे. सावरकरांच्या म्हणण्यानुसार रावणाचा पराभव करुन राम आयोध्येला परतले तेव्हा भारताची राष्ट्र म्हणून सुरुवात झाली. हे सावरकरांचे म्हणणे खोटे आहे. १९९२ मध्ये बाबरी मशीद ही राम जन्मभूमी असल्यामुळे पाडण्यात आली हे देखील असत्य आहे. उरीगौडा व नान्जेगौडा हे टिपूचे मारेकरी हेदेखील खोटे आहे. अखेर त्याने लिहिलंय की सत्य याचा अर्थ समता आहे आणि या सत्यानेच हिंदुत्वाचा परभाव होऊ शकतो.
या ट्विटनंतर कर्नाटक पोलिसांनी तातडीने चेतन कुमार अहिंसावर आयपीसीच्या २९५ अे, ५०५ बी कलामा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा व धर्माचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. चेतन कुमारच्या या ट्विटनंतर उजव्या विचारसरणीच्या संघटना आक्रमक झाल्या. बजरंग दलाच्या वतीने चेतनवर एफआयआर दाखल करण्यात आली. अटक केल्यानंतर पोलीस अधिक तपास करत असून त्याला न्यायलयातून पोलीस कस्टडी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
चेतन कुमार हा नेहमी सडेतोड राजकीय भूमिका घेत असतो. हिजाब प्रकरण जेव्हा कर्नाटकात टिपेला पोहोचले होते, त्याकाळात अभिनेचा चेतन कुमार अहिंसाने न्यायाधिशांच्या विरोधात आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्यासाठी त्याला अटकही झाली होती. त्याने समाजाच्या एका विशिष्ठ वर्गाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला यापूर्वी समजही मिळाली होती.
काही दिवसानंतर कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. 1798 मध्ये झालेल्या युध्दात इंग्रजांनी टिपू सुल्तानला मारले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचा दावा आहे की टिपूची हत्या उरीगौडा व नान्जेगौडा यांनी केली होती. हा केवळ मतावर डोळा ठेवून प्रचार सुरू असल्याचा दावा काही इतिहासकारांनीही केला होता.
हेही वाचा - Allu Arhas Yoga skills : मुलगी अल्लू अर्हाचे योग कौशल्य पाहून अल्लू अर्जुन झाला थक्क