ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut : कंगना राणौतनं 'तेजस' रिलीजपूर्वी घेतलं रामलल्लाचं दर्शन - कंगना रनौत न्यूज

Kangana Ranaut : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगना राणौत तिचा आगामी चित्रपट 'तेजस'च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वी ती 26 ऑक्टोबर रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाचे दर्शनासाठी गेली.

Kangana Ranaut
कंगना राणौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 4:31 PM IST

मुंबई - Kangana Ranaut : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतनं गुरुवारी अयोध्येत भगवान रामलल्लाची पूजा केली असून या मंदिराच्या पुजाऱ्यानं तिला पिवळ्या रंगाचा शेला आणि प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. यापूर्वी कंगनानं अयोध्येत भव्य राम मंदिर उभारताना देखील पाहिले आहे. जेव्हा ती अयोध्येत गेली होती, तेव्हा तिच्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. राम मंदिराशी संबंधित प्रत्येक गोष्ट अगदी तिनं बारकाईने समजून घेतल्या आहेत. दरम्यान आता तिनं यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, 'हे आमचे भाग्य आहे की आम्ही हे मंदिर आमच्या डोळ्यांसमोर उभारताना पाहत आहोत. या मंदिरासाठी हिंदूंनी शतकानुशतके संघर्ष केला आहे. रामलल्लाचे मंदिर 600 वर्षांनंतर बांधले गेले आहे. आमच्या पिढीला हा भाग्याचा दिवस पाहायला मिळत आहे'. त्यानंतर तिनं पुढं सांगितलं की, 'हे मंदिर पाहण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्राणही गमाविले आहे'. याशिवाय कंगना रणौतनं अयोध्येवर एक स्क्रिप्टही लिहिली आहे असं तिनं सांगितलं. तसेच तिनं पुढं म्हटल, 'आज हे सर्व मोदी सरकारमुळेच झालं आहे, आमच्या योगीजींनीही याबाब खूप संघर्ष केला आहे'.

  • #WATCH | UP | In Ayodhya, actor Kangana Ranaut says, "...Finally the Ram Lalla temple has been built. This is a centuries-long struggle by Hindus and our generation is able to see this day. I have written a script on Ayodhya and also did research...This is a 600-year-long… pic.twitter.com/FGrAlLRFNW

    — ANI (@ANI) October 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगना राणौत अयोध्येत : नवी दिल्लीतील लाल किल्ल्यातील रामलीलेत रावण दहन करून इतिहास रचल्यानंतर कंगना नुकतीच अयोध्येला पोहोचली. त्याआधी ती इस्त्रायलच्या राजदूताला भेटली होती. कंगनाचा 'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी ती श्रीरामाचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला गेली आहे. सध्या काही कंगनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कंगना राणौत केले फोटो शेअर : कंगनानं इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहलं, 'हे माझ्या रामा, व्वा! मला श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आहे, मी त्यांची भक्त आहे आणि आज मला त्यांचा इतका आशीर्वाद मिळाला आहे की, मला श्री हरी विष्णू, परम पूजनीय अवतार, महान धनुर्धारी, अप्रतिम योद्धा, तपस्वी राजा, मरिदापुरुषोत्तम श्री राम यांचे जन्मस्थान बघायला मिळाले. माझ्या 'तेजस' या चित्रपटात रामजन्मभूमीची विशेष भूमिका आहे, त्यामुळे मला रामलल्ला घेऊन माझा राम धन्य वाटले'. तेजस'मध्ये कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. यात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाख नायर यांच्याही भूमिका आहेत. सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे.

हेही वाचा :

  1. Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियांका चोप्रा येणार मायदेशी; फोटो केला शेअर...
  2. Deepika Ranveer wedding video : दीपिका आणि रणवीर सिंगची वेडिंग फिल्म्स 'कॉफी विथ करण 8' मध्ये लॉन्च
  3. Elvish Yadav Extortion Call: एल्विश यादवकडून खंडणी मागणारा गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.