ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut : 'हृतिक रोशननंतर वीर दासची लुटली इज्जत ', कंगना राणौतने किसिंग सीनवर दिले उत्तर - किसिंग सीन

अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानासाठी चर्चेत असते. यावेळी कंगनाने अभिनेता वीर दासच्या किसिंग सीनवर तिची प्रतिक्रिया देत हृतिक रोशनला टोमणा मारला आहे.

Kangana Ranaut
कंगना राणौत
author img

By

Published : Jul 24, 2023, 4:38 PM IST

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत कसे मांडायचे हे तिला परिपूर्ण माहीत आहे. अलीकडेच तिने स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासच्या किसिंगवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच तिने याद्वारे हृतिक रोशनलाही टोमणा मारला आहे.

किसिंग सीन दरम्यान कंगनाने वीर दासला दुखवले : कंगना राणौतने तिच्या 'रिव्हॉल्व्हर रानी' चित्रपटातील एका दृश्यासाठी वीर दासचे किस घेतल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, किस घेतल्यानंतर वीर दासच्या ओठातून रक्त येऊ लागले होते. दरम्यान आता कंगनाने या दाव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर किसिंग सीनशी संबंधित बातमी शेअर केली आणि लिहिले- 'हृतिक रोशननंतर मी बिचाऱ्या वीर दासची इज्जत लुटली? हे कधी झाले?' या कॅप्शनसोबत कंगनाने हसणारा इमोजीही शेअर केला आहे.

Kangana Ranaut
कंगना राणौत

कंगना राणौत आणि हृतिक रोशनमध्ये काय वाद आहे? : कंगना आणि हृतिकमध्ये छत्तीसचा आकडा आहे. कंगना अनेकदा हृतिकवर निशाणा साधत असते, मात्र हृतिक तिला कधीच प्रतिसाद देत नाही. २०१६ ते २०१७ दरम्यान दोघांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कंगना ही नेहमीच दावा करते की तिने हृतिकला डेट केले आहे, मात्र तो या गोष्टीला खोट असल्याचे सांगतो.

कंगना राणौतचे आगामी चित्रपट : कंगना राणौतचे अनेक मोठे चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत. 'तेजस', 'इमर्जन्सी' आणि 'चंद्रमुखी २' हे तिचे आगामी चित्रपट आहेत. 'चंद्रमुखी २' हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय तिचा 'तेजस' हा चित्रपट या वर्षी २० ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यानंतर तिचा आगामी बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' हा चित्रपट २४ नोव्हेंबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये कंगना इंदिरा गांधींची भूमिका रूपेरी पडद्यावर साकारत आहे.

हेही वाचा :

  1. Jayant Sawarkar passsed away : ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर यांचे निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  2. Oppenheimer 3 day Collection : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपेनहाइमर'ने तीन दिवसांत भारतात कमविले ५० कोटी रुपये...
  3. Samantha acting break : सामंथाने दाखवली सुट्टीची सुंदर झलक, खास मैत्रिणीसोबत गाठले बाली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.