ETV Bharat / entertainment

Tejas Special Screening: संरक्षण मंत्री आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी 'तेजस'चं स्पेशल स्क्रीनिंग - Kangana Ranaut organized a special screening

Tejas Special Screening: हिंदी चित्रपटसृष्टीतील 'क्वीन' कंगना राणौत तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिलीजपूर्वी कंगनानं संरक्षण मंत्री आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले आहे.

Tejas Special Screening
तेजस स्पेशल स्क्रीनिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 3:59 PM IST

मुंबई - Tejas Special Screening : अभिनेत्री कंगना रणौत संरक्षण मंत्री आणि भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यासाठी सज्ज झाली आहे. काही वेळापूर्वी कंगना ही मुंबई एअरपोर्टवर झळकली. यावेळी तिनं तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटाबद्दल माहिती दिली. कंगनानं सांगितलं की, 'आज आम्ही एका खास कार्यक्रमासाठी जात आहोत. आम्ही आमच्या 'तेजस' स्पेशल स्क्रीनिंग हे संरक्षण मंत्री आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित केले आहे. या स्क्रीनिंगला भारतीय हवाई दलाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. मला आशा आहे की सर्वकाही चांगले होईल'.

'तेजस' स्पेशल स्क्रीनिंग : आज दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी 'तेजस' चिपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केल्यानं कंगना ही खूप उत्साहीत दिसली. कंगनाचा 'तेजस' 27 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. सर्वेश मेवाडा दिग्दर्शित या चित्रपटाची कहाणी हवाई दलातील वैमानिक तेजस गिलच्या विलक्षण प्रवासाभोवती फिरणारी आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आणि अभिमान जागृत करणार असणार आहे. या चित्रपटामध्ये भारतीय हवाई दलाचे वैमानिक आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी कसे अथक परिश्रम घेतात हे दाखवण्यात आलंय.

'इमर्जन्सी' चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलली : दरम्यान सध्या कंगनाचा मोस्ट अवेटेड 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबद्दलची घोषणा नुकतीच कंगनानं केली होती. तिनं सांगतलं होत की, 'इमर्जन्सी' हा चित्रपट एक कलाकार म्हणून माझ्या संपूर्ण आयुष्यासाठीचा धडा आहे. 'इमर्जन्सी' हा केवळ एक चित्रपट नाही, माझ्यासाठी हा एक व्यक्ती म्हणून माझ्या मूल्यांची आणि चारित्र्याची कसोटी आहे. या चित्रपटाच्या टिझर्स आणि पोस्टर्सना मिळालेल्या उदंड प्रतिसादानं आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. मी कुठेही जाते, तेव्हा लोक मला 'इमर्जन्सी'च्या रिलीजच्या तारखेबद्दल विचारतात'. 'इमर्जन्सी' हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होणार होता. या चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसेल.

हेही वाचा :

  1. Vivek Agnihotri announces Parva : महाभारतावर तीन चित्रपट बनवण्याचा विवेक अग्निहोत्रींचा निर्धार, 'पर्व' फ्रँचाइजीची केली घोषणा
  2. Ganapath & Yaariyan 2 BO day 2 : 'गणपथ' आणि 'यारियां 2' चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर थंड कमाई
  3. Aamir Khan moving to chennai : आमिर खान आईसह चेन्नईला शिफ्ट होणार, वाचा कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.