ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut interview : नेपोटीझम विरोधात जाहीर भूमिका घेणारी पहिली अभिनेत्री, कंगना रनौत!

बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्री कंगना रणौत नेहमी नेपोटिझमला विरोध करत आली आहे. चित्रपट घराण्याबाहेरील कलाकारांना संधी दिली जात नाही म्हणूनच तिने निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टकाले आणि टिकू वेड्स शेरू या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तिची सविस्तर मुलाखत ईटीव्ही भारत प्रतिनिधी किर्तीकुमार कदमने घेतली आहे.

Kangana Ranaut  i
कंगना रनौत
author img

By

Published : Jun 26, 2023, 3:17 PM IST

मुंबई - बॉलिवूडमधील बिनधास्त आणि निडर व्यक्तिमत्व म्हणजे कंगना रनौत. कंगनाने बॉलिवूड मधील प्रथापितांविरोधात बिनदिक्कत व्यक्तव्ये केली. स्पष्टवक्ती म्हणून तिची ख्याती असून तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे बॉलिवूडमध्ये तिचे मित्र कमी आणि दुश्मन जास्त झाले आहेत. तिला बॉयकॉट करण्याचा प्रयत्न झाला असे तिचे म्हणणे आहे. ह्रितिक रोशन, जावेद अख्तर, दीपिका पदुकोण, आलिया भट, रणबीर कपूर, करण जोहर इत्यादी अनेक सेलिब्रिटीजच्या विरोधात तिने वक्तव्ये केलेली आहेत आणि त्यामुळे बॉलिवूडमधील आतल्या गोटातील कंपूची कमान तिच्या मते, करण जोहरच्या हाती आहे. तो तिच्यावर खार खातो आणि तिला दमात घेण्याचा प्रयत्न करतो. तिच्या नेपोटीझम वरील घणाघाती मतांमुळे देशभरात त्यावरून वादविवाद सुरु झाले ते अजून शमण्याचे नाव घेत नाहीयेत. या सर्व घडामोडींमुळे कंगनाने चक्क स्वतःच निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिची निर्मिती संस्था मणिकर्णिका फिल्म्सचे पहिले पुष्प आहे ‘टिकू वेड्स शेरू’. या चित्रपटाची निर्मिती कंगनाने ऍमेझॉन प्राईम सोबत केली असून तिच्या मते तिचे हे पहिले बाळ आहे. नुकतीच आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी कंगना रानौतची भेट घेतली आणि विविध विषयांवर गप्पा मारल्या.

Kangana Ranaut
कंगना रानौत

कंगना मॅम, निर्माती होणं हे खूप जिकिरीचं काम आहे ज्यात गणित पक्के असावं लागतं. तुमचा काय अनुभव आहे?

माझ्या मते निर्मात्याचे काम सर्वात कठीण काम आहे. खरंतर स्टार सिस्टिमच्या मायाजालात निर्मात्यांना कमी लेखलं जातं. निर्माता नसेल तर चित्रपट बनणारच नाही. परंतु याच स्टार सिस्टिमने बऱ्याचदा निर्मात्यांना भिकेला लावले आहे. त्यांच्या गलेलठ्ठ मानधनामुळे कधी कधी निर्माते ‘टकले’ झालेले आहेत. आधीच्यांचे अनुभव पाहता निर्माता होणे फारशी आल्हाददायक जागा नाहीये. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे या इंडस्ट्रीत पाऊल टाकण्यासाठी सिद्ध झालेले जवळपास सर्वचजण फक्त अभिनेता वा अभिनेत्री बनण्यासाठी आलेले असतात. लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन वा निर्माता बनण्यासाठी फार जणं उत्सुक नसतात. या इंडस्ट्रीत नाव फक्त अभिनेत्यांचे होते म्हणून असेल कदाचित परंतु हे बदलण्याचा प्रयत्न देखील होत नाही ही खंत आहे. त्यामुळेच जेव्हा मी निर्माती व्हावयाचे ठरविले तेव्हा मला भीती वाटली होती. चित्रपट चालला तर ठीक अन्यथा आर्थिक नुकसान निर्मात्याचेच होते.

Kangana Ranaut
टिकू वेड्स शेरू पोस्टर

निर्माती बनताना मला अनेक प्रश्नांनी अनेक ग्रासले होते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना? कलाकार वेळेवर येतील ना? दिग्दर्शक वेळेत शूट कम्प्लिट करू शकेल ना? वितरक चांगले मिळतील ना? शुटिंग्सचे लोकेशन्स चांगले असतील ना? ठरलेल्या बजेटमध्ये चित्रपट पूर्ण होईल ना? असे एक ना अनेक प्रश्न मला भेडसावत होते. तरीही मी पुढे जायचे ठरविले. परंतु निर्माता नेहमी इतरांवर अवलंबून असतो. लेखकाने चांगली संहिता लिहिली पाहिजे. दिग्दर्शकाने त्यावर योग्य सोपस्कार केले पाहिजेत. कलाकारांनी त्यात दमदार अभिनय केला पाहिजे कारण कधी कधी कलाकारांच्या खासगी प्रॉब्लेम्समुळे त्यांच्या त्या दिवशीच्या अभिनयावर परिणाम होतो. अशा अगणित गोष्टींवर निर्माता अवलंबून असतो. त्यामुळे तो सतत तणावाखाली असतो.

या सर्व गोष्टी विचारात घेता मी सुरुवातीला एका लहान चित्रपटाने सुरुवात करण्याचे ठरविले. उगाचच १५-२० मोठे कलाकार घेऊन मला माझ्या डोक्याला ताप द्यायचा नव्हता. फक्त दोन मुख्य कलाकार असलेले स्क्रिप्ट मी निवडले. त्यामुळे अन्य फाफटपसाऱ्याला चान्स नव्हता. त्यामुळे सर्वकाही माझ्या देखरेखीखाली होऊ शकले. मी जेव्हा एखादी गोष्ट करण्याचे ठरविते तेव्हा त्याचा सारासार विचार करते. ‘टिकू वेड्स शेरू’च्या निर्मिती प्रक्रियेविषयी मी समाधानी आहे. अन्यथा तो माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असता निर्माती म्हणून.

Kangana Ranaut
कंगना रणौत

तुम्ही स्वतः उत्तम अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. तेव्हा अभिनय आणि दिग्दर्शन न करता फक्त निर्मिती का केली? कलाकार निवड कशी झाली?

मी एक सांगते की सात आठ वर्षांपूर्वी हा चित्रपट मी आणि इरफान खान करणार होतो. साई कबीरची स्क्रिप्ट मला आणि इरफानला आवडली होती. त्याचे नाव होते ‘डिव्हाईन लव्हर्स’. परंतु चित्रपट सुरु होता होता दिग्दर्शक आजारी पडले आणि तो थंड बासनात गेला. नंतर इरफान सर आजारी पडले आणि आता ते आपल्यात नाहीयेत. परंतु ही स्क्रिप्ट त्यांच्या खूप जवळची होती आणि त्यांनीच पुढाकार घेऊन चित्रपट सुरु केला होता. त्यामुळे जेव्हा निर्मिती क्षेत्रात उतरायचे ठरले तेव्हा मला या संहितेची आठवण झाली. आणि साई कबीर देखील तयार झाले जे या चित्रपटाचे दिग्दर्शक सुद्धा आहेत. मी दिग्दर्शन करू शकले असते परंतु साई कबीरने ही स्क्रिप्ट लिहिली आहे आणि त्यांना त्यातील बारकावे तोंडपाठ आहेत. माझे असे मत आहे की दिग्दर्शक लेखक सुद्धा असावा म्हणजे कॅरॅक्टर ग्राफ, चित्रपटाचा वेग, कुटून काय हवे आहे या गोष्टी सोप्या होतात. तसेच तो लेखक असल्यामुळे त्याने चित्रपट व्हिझुएलाईझ केलेला होता. अर्थात लेखनात माझेसुद्धा योगदान आहे.

मला मुख्य भूमिकेसाठी एक प्रस्थापित नट हवा होता. इरफानच्या तोडीचा नट त्यासुमारास कोणीही नाहीये. परंतु नवाझुद्दीन सिद्दीकी त्यांच्या जवळपास पोहोचू शकेल असा कलाकार आहे. त्यामुळे मी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. परंतु मला असे सांगण्यात आले की नवाझ सध्या नवीन चित्रपट साइन करीत नाहीये. त्याची पुढची चार पाच वर्षे बुक आहेत आणि तो कुठल्याही परिस्थितीत नवीन चित्रपट घेत नाहीये. हा माझ्यासाठी धक्का होता. तरीही प्रयत्न करूया म्हणून मी त्याला फोन केला. तो त्यावेळेस बंगळुरू मध्ये शूटिंग करीत होता. मी त्याला फोनवर सांगितले की, ‘मला तुला भेटायचे आहे.’ तो म्हणाला, ‘अर्जंट असेल तर बंगळुरू मध्ये भेटू.’ मी तडक बंगळुरूची फ्लाईट पकडली आणि तिथे पोहोचले. तो मला तिथे पाहून अवाक झाला. मी त्याला त्याला भेटण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘तू इतक्या लांब आली आहेस म्हणजे काहीतरी खास असणार. चल करूया.’ आणि माझा जीव भांड्यात पडला. मग मी त्याला स्क्रिप्ट ऐकविली आणि तो संहितेच्या प्रेमातच पडला.

Kangana Ranaut
ईटीव्ही प्रतिनिधी किर्तीकुमार कदमसोबत कंगना रणौत

नायिकेच्या भूमिकेसाठी मला नवीन मुलीची गरज होती. नाही म्हणायला मी हा रोल करू शकले असते परंतु तो स्क्रिप्टवर अन्याय झाला असता. मला नवीन मुलीत निरागसता, अल्लडपणा हवा होता. टिकू विशीतील तरुणी आहे. अनेक मुलींच्या ऑडिशन्स झाल्या. साधारण हजार एक मुलींची टेस्ट झाल्यावर मला अवनीत कौर सापडली. तिने टेलिव्हिजनवर काम केलंय त्यामुळे तिला माध्यमाची ओळख होती. तसेच ती शिकण्यासाठी तत्पर होती त्यामुळे ही मुलगी चांगले काम करू शकेल याचा विश्वास वाटला. आणि तिने खरोखरीच उत्तम काम केले आहे. मी तिला सांगितले आहे की फिल्म इंडस्ट्रीत लंबी रेस का घोडा बनायला हवे. मी स्वतः सतरा वर्षे अभिनेत्री म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहे. मलाही सांगण्यात आले होते की हिरॉईनचे शेल्फ लाईफ चार पाच वर्षे असते त्यामुळे तू आयटम सॉंग्स कर. मला अनेक अड्वाईस देण्यात आले परंतु माझे विचार वेगळे आहेत आणि त्यामुळेच मी इतकी वर्षे टिकून आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे जास्त ‘टिकू’ शकत नाहीत. ती एक अप्रतिम नृत्यांगना असल्यामुळे तिला भावमुद्रा लगेच जमतात. नवाझुद्दीनने देखील तिची स्तुती केली आहे.

हेही वाचा -

१. Thalapathy Vijay Courts Controversy : ना रेडी गाण्यात धुम्रपान केल्याबद्दल थलपथी विजयवर खटला दाखल

२. Adipurush Box Office Day 10 Collection: बॉक्स ऑफिसवर आदिपुरुषला थोडा दिलासा, रविवारी कमाईतही वाढ

३. Sudipto Sen Announce Bastar : द केरळ स्टोरीनंतर सुदीप्तो सेन नक्षलवादावर बनवणार चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.