ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut : कंगना रणौतने 'चंद्रमुखी २'मध्ये केले भरतनाट्यम ; पण नृत्यामुळे झाली ट्रोल - चंद्रमुखी २

कंगना राणौत ही 'चंद्रमुखी २'मध्ये 'स्वागतांजली' या गाण्यात भरतनाट्यम केल्यामुळे ट्रोल होत आहे. काही चाहत्यांना तिचा हा नवा अंदाज आवडला आहे, त्यामुळे तिला अनेक यूजर्स सोशल मीडियावर पाठिंबा देत आहेत.

Kangana Ranaut
कंगना रणौत
author img

By

Published : Aug 14, 2023, 2:54 PM IST

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी 'चंद्रमुखी २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनाचे याआधीचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे तिला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत. कंगना 'चंद्रमुखी २' चित्रपटाद्वारे साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अलीकडेच कंगनाचा फर्स्ट लूक आणि चित्रपटातील 'स्वागतांजली' हे पहिले गाणे रिलीज करण्यात आले होते. दरम्यान आता 'स्वागतांजली' गाण्यात भरतनाट्यम केल्यामुळे कंगना राणौतला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. 'स्वागतांजली' हे गाणे ऑस्कर विजेते संगीतकार एमएम किरवाणी यांनी संगीतबद्ध केले आहे.

कंगना रणौतला सोशल मीडियावर केले ट्रोल : 'स्वागतांजली' या गाण्यात कंगना राणौतने भरतनाट्यम केला आहे. मात्र तिचे नृत्य काही जणांना आवडलेले नाही. त्यामुळे काही यूजर्स तिला ट्विटरवर ट्रोल करत आहेत. दरम्यान एका यूजरने तिला ट्रोल करत लिहिले की, कंगना राणौत चांगली अभिनेत्री असू शकते, पण ती चांगली डान्सर नाही. तर एका यूजरने लिहिले, कंगनापेक्षा 'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीला 'चंद्रमुखी २'मध्ये कास्ट करायला हवे होते. तर काही चाहत्यांनी कंगनाला पाठिंबा दिला आहे. काही चाहत्यांना तिचा हा नवा अवतार खूप आवडला असून तिचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

'चंद्रमुखी २' चित्रपटाबद्दल : 'चंद्रमुखी २' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पी वासू यांनी केले आहे. या चित्रपटात कंगना रणौत शीर्षक भूमिकेत दिसणार असून साऊथ स्टार राघव लॉरेन्सही मुख्य भूमिकेत आहे. 'चंद्रमुखी २' हा २००५ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'चंद्रमुखी'चा सीक्वल आहे. २००५ मध्ये आलेला 'चंद्रमुखी' चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 'चंद्रमुखी'मध्ये रजनीकांत आणि ज्योतिका हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली होती. 'चंद्रमुखी २' हा चित्रपट सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी १९ सप्टेंबरला तामिळ, तेलुगु, हिंदी, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. OMG 2 box office collection day 3 : 'ओ माय गॉड २' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन तीन दिवसात ५० कोटीच्या जवळ पोहचले
  2. Jailer box office collection Day 4 : 'जेलर' चित्रपट चौथ्या दिवशी १५० कोटीच्या उंबरठ्यावर
  3. Chaleya Teri Aur : 'जवान'मधील नवीन 'छलेया तेरी ओर' गाण्यावर शाहरुखचा नयनतारासोबत रोमान्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.