मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट इमर्जन्सीचा ( Emergency Teaser )टीझर रिलीज झाला आहे. 1975 साली भारतात लागू करण्यात आलेल्या आणिबाणीच्या विषयावर आधारित हा चित्रपट आहे. यात कंगना रणौत इंदिरा गांधीच्या ( Kangana Ranaut as Indira Gandhi ) करारी भूमिकेत दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या टीझरमध्ये इंदिरा गांधी आपल्या कार्यलयात फाईल चेक करीत आहेत. त्यावेळी त्यांचा सहाय्यक येऊन सांगतो की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन फोन लाईवर आल्यानंतर ते तुम्हाला मॅडम म्हणू शकतात का? यावर इंदिरा गांधीच्या भूमिकेत असलेली कंगना रणौत म्हणते, अमेरिकेच्या राष्टाध्यक्षांना सांगा की मला माझ्या ऑफिसमधील सर्वजण 'सर' म्हणूनच बोलवतात.
कंगना राणौतने इन्स्टाग्रामवर तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या फोटोत पांढरे केस, चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या यामध्ये कंगनाचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. या पोस्टरसोबत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आणीबाणीचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. जगाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि वादग्रस्त महिलांपैकी एकाचे पोर्ट्रेट.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा चित्रपट भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिला श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या घटनांवर आधारित आहे. 2023 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.
या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिका साकारत असून कंगनानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाती कंगना आणि रेणू पिट्टी निरमात्या आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथाही कंगनाचीच आहे.
हेही वाचा - ''महिलांसाठी मुंबई दिल्लीपेक्षा अधिक सुरक्षित'' सान्या मल्होत्रा