मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत, ही हिमाचल प्रदेशच्या मनाली जिल्ह्यातील आहे हे सर्वांनाच माहीत आहे. कंगनाला हिमाचल आणि मनाली जिल्ह्यातील खूप काही गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे तिन सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सना मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
कंगनाने शेअर केली पोस्ट : कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. तसेच लिहिले की, 'महत्त्वाची माहिती, हिमाचल प्रदेशला जाऊ नका. संततधार पावसामुळे येथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत अनेक भूस्खलन होतील आणि नद्यांना पूर येईल, संततधार पाऊस थांबला असला तरी, कृपया या पावसाळ्यात हिमाचलला भेट देणे टाळा, असे तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
हिमालयीन प्रदेशाची स्थिती बिकट : कंगना रनौतने या पोस्टमध्ये लिहिले, 'हिमालयीन प्रदेशाची स्थिती चांगली नाही. काहीच असामान्य नाही. पावसात असेच होते, शेवटी तो बलाढ्य हिमालय आहे, गंमत नाही, तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. साहसी होण्यापासून परावृत्त व्हा, धैर्य दाखवण्यासाठी ही चांगली वेळ नाही. बियास नदीने उग्र रूप धारण केले आहे. कमकुवत हृदयाचे व्यक्ती याच्या आसपास जाऊ शकत नाही. या आवाजामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पावसात हिमाचलला जाऊ नका. असे तिने पोस्टद्वारे सांगितले आहे.
कंगना राणौतची इंस्टाग्राम स्टोरी : नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे डोंगराळ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण होत आहे. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस आणि खराब हवामानामुळे रविवारी शिमला-कालका मार्गावरील रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये तिने पूर्ण हिमाचल प्रदेशातील परिस्थिती सांगितली आहे. यापूर्वी देखील हिमाचल प्रदेशात अनेक घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे अशा परिस्थित याठिकाणी जाणे हे टाळले पाहिजे. नाही तर मोठा अपघात होऊ शकतो. सध्या हिमाचल प्रदेशामधील असणाऱ्या नद्यांना फार जास्त पाणी आले आहे. त्यामुळे आता परिस्थिती फार बिकट आहे.
-
Old Aut bridge, Mandi!!!
— Queen of Himachal (@himachal_queen) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
PLEASE AVOID TRAVEL TO HILLY AREAS FOR NEXT 36-48 hours!!MANY ROADS ARE BLOCKED DUE TO LANDSLIDES!! RIVERS ARE IN A FURIOUS MOOD!!BE SAFE!! pic.twitter.com/WFcTksAxob
">Old Aut bridge, Mandi!!!
— Queen of Himachal (@himachal_queen) July 9, 2023
PLEASE AVOID TRAVEL TO HILLY AREAS FOR NEXT 36-48 hours!!MANY ROADS ARE BLOCKED DUE TO LANDSLIDES!! RIVERS ARE IN A FURIOUS MOOD!!BE SAFE!! pic.twitter.com/WFcTksAxobOld Aut bridge, Mandi!!!
— Queen of Himachal (@himachal_queen) July 9, 2023
PLEASE AVOID TRAVEL TO HILLY AREAS FOR NEXT 36-48 hours!!MANY ROADS ARE BLOCKED DUE TO LANDSLIDES!! RIVERS ARE IN A FURIOUS MOOD!!BE SAFE!! pic.twitter.com/WFcTksAxob
हेही वाचा :