ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut praises for Deepika : कंगना रणौतने केले दीपिका पदुकोणचे कौतुक, म्हणाली - 'भारतीय महिला सर्वोत्तम आहेत' - भारतीय महिला सर्वोत्तम आहेत

भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या नाटू नाटू या गाण्याचा स्टेज परफॉर्मन्स स्टार प्रेझेंटर दीपिका पदुकोणने संचलित केला. दीपिका ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असताना, तिची समकालीन कंगना राणौतने 'भारतीय महिला सर्वोत्तम आहेत' असे म्हणत दीपिकाचे कौतुक केले.

कंगना रणौतने केले दीपिका पदुकोणचे केले कौतुक

author img

By

Published : Mar 13, 2023, 3:21 PM IST

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणची ऑस्कर 2023 मध्ये झळकल्याबद्दल तिचे कंगना रणौतने मोकळेपणाने कौतुक केले आहे. अलिकडे पठाण चित्रपटात चमकलेल्या अभिनेत्री दीपिकाने अकादमी पुरस्कार सोहळ्याला सादरकर्ती म्हणून हजेरी लावली होती आणि आरआरआरच्या पॉवर-पॅक्ड नाटू नाटू या गाण्याला जोरदार प्रोत्साहन दिले होते. नाटू नाटू गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसाठी अकादमी पुरस्कार जिंकला. ऑस्करमधील नाटू नाटू गाण्याच्या लाइव्ह परफॉर्मन्सला सर्वांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले.

  • How beautiful @deepikapadukone looks, not easy to stand there holding entire nation together, carrying its image, reputation on those delicate shoulders and speaking so graciously and confidently. Deepika stands tall as a testimony to the fact that Indian women are the best ❤️🇮🇳 https://t.co/KsrADwxrPT

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) March 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर दीपिकाचे कौतुक करत ती किती सुंदर दिसते आहे याबद्दल लिहिले. कंगना म्हणाली की अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर संपूर्ण देशाला एकत्र ठेवून, त्याची प्रतिष्ठा आणि प्रतिमा त्या नाजूक खांद्यावर वाहणे आणि इतके प्रेमळ आणि निर्भयपणे बोलणे सोपे नाही. भारतीय महिला सर्वोत्कृष्ट आहेत आणि दीपिका हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे तिने म्हटलंय. 'दीपिका किती सुंदर दिसत आहे, संपूर्ण देशाला एकत्र धरून, तिची प्रतिमा, प्रतिष्ठा त्या नाजूक खांद्यावर घेऊन तिथे उभी राहणे सोपे नाही आणि किती सहज आत्मविश्वासाने ती बोलली. दीपिका भारतीय महिला सर्वोत्तम आहेत याची साक्ष म्हणून ताट उभी आहे', असे कंगनाने ट्विट केले आहे.

भारतीय क्रांतिकारक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या मैत्रीवर आधारित असलेल्या आरआरआरमधील एका महत्त्वपूर्ण क्षणी वाजणारे नाटू नाटू हे गाणे सादर करण्यासाठी दीपिका मंचावर आली. नाटू नाटूबद्दल अधिक तपशीलवार सांगताना ती म्हणाली की हे एक उत्तम गाणे आहे आणि वसाहतविरोधी भावना दाखवून देताना चित्रपटाच्या सीक्वेन्समध्ये येते.

दीपिकाचे कौतुक करणाऱ्या कंगनाच्या लेटेस्ट ट्विटमुळे अनेकांना धक्का बसला कारण कंगनाने यापूर्वी दीपिकाच्या बाबतीत सोशल मीडियावर नेहमीच टीका केली होती. लॉक अप या तिच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान, कंगनाने दीपिकाला टारगेट केले होते. दीपिकाला ती तुकडे तुकडे गँगची सदस्य असल्याचा म्हणत होती. जेएनयूमध्ये जेव्हा थप्पडच्या प्रमोशनच्या निमित्ताने दीपिका विद्यार्थ्यांच्या भेटीस गेली होती तेव्हा कंगनाने तिच्यावर खूप आगपाखड केली होती.

हेही वाचा - The Academy Awards: 95 व्या ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी पहा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.