ETV Bharat / entertainment

Kamal Haasan Birthday : 'तुम्हाला पाहात मोठं झालोय', म्हणत प्रभासनं दिल्या कमल हासनला शुभेच्छा - त्रिशा कृष्णन

Kamal Haasan Birthday : साऊथ अभिनेता कमल हासन आज त्यांचा 69वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान या खास प्रसंगी त्यांना चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार शुभेच्छा देत आहेत.

Kamal Haasan Birthday
कमल हासन यांचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 3:17 PM IST

मुंबई - Kamal Haasan Birthday : साऊथ अभिनेता कमल हासन आज 7 नोव्हेंबर रोजी आपला 69वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्यांना अनेकजण शुभेच्छा देताना दिसत आहेत. सध्या कमल हासन त्यांच्या आगामी प्रोजेक्टमुळं चर्चेत आहे. त्यांच्या आगामी 'ठग लाइफ' चित्रपटातील सहकलाकारांचा फर्स्ट लुक शेअर करण्यात आला आहे. कमल हासनच्या वाढदिवसानिमित्त साऊथ सिनेसृष्टीतील स्टार्सही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. साऊथ स्टार प्रभासनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहलं, 'एका अभिनेत्यापासून ते एक दिग्गज आणि नंतर एक आयकॉन... आम्ही तुम्हाला पाहात मोठं झालोय. कमल हसन सर, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी भाग्यवान आहे की तुमच्यासोबत काम केलं.'

कमल हसन यांचा वाढदिवस : कमल हासन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना 'ठग लाइफ'मधील सहअभिनेत्री त्रिशा कृष्णननं लिहलं,' वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कमल हासन सर, तुमच्यासोबतच्या चित्रपटाचा अनुभव खूप छान होता'. हिंदी चित्रपटसृष्टी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थनं कमल हासनला शुभेच्छा देत एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये त्यानं लिहलं, 'कमल हासन सर, ग्रेटेस्ट वाढदिवसाच्या शुभेच्छा. याशिवाय 'इंडियन 2' चे दिग्दर्शक शंकर यांनी देखील कमल हासन यांना 'इंडियन 2'चे बीटीएस फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रुती हासननं शेअर केली पोस्ट : मुलगी श्रुती हासननं एक सुंदर पोस्ट करून वडील कमल हासन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रुतीनं तिच्या वडिलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये काही त्यांचे बालपणीचे फोटो आहेत. हा व्हिडीओ शेअर करत श्रुतीनं लिहलं की, 'माय डिअर अप्पा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुम्ही आणि तुमचे विचार खूप छान आहात आणि मला खूप काही शिकायला मिळाले, तुम्ही एक अद्भुत व्यक्तिमत्व आहात, तुम्ही गायन, नृत्य आणि अभिनय या प्रत्येक कलेत पारंगत आहात, मी प्रार्थना करते की, तुमचं प्रत्येक वर्ष अद्भुत जावो. तुझ्यावर खूप प्रेम आहे...तुम्ही खरोखरच सर्व गोष्टींचे ओजी रॉक स्टार आहात.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. Yodha New Release Date : सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा'चं प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर
  2. Sara Ali Khan : सारा खाननं सांगितला पोटाची चरबी कमी करण्याचा अनुभव, कोलाज फोटो केला शेअर
  3. Raha Kapoor birthday : रणबीर आलियाची लेक राहाचा पहिला वाढदिवस ठरला '1 नंबर' संस्मरणीय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.