मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या आगामी वेब सीरिज लस्ट स्टोरी 2 मुळे चर्चेत आहे. या वेब सीरिज ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ही वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजतील काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया आणि विजय वर्माने या वेब सीरिजमधील मुलाखतीत प्रेम आणि वासनेबाबतचे त्यांचे अनुभव सांगितले आहेत. नुकतेच नीना गुप्ताने तिच्या करिअरमधील एक किसिंग सीनचा खुलासा केला. आता काजोलने 'फिमेल प्लेजरर'वर आपले मत ठेवत एक मोठी गोष्ट सांगितली आहे. काजोलची ही गोष्ट पुरुषांना देखील विचारात पाडणारी आहे.
स्त्री सुखावर काजोलचे बोलणे : लस्ट स्टोरी 2 या वेब सीरिजवर बोलताना काजोलने म्हटले आहे की, या समाजात खाणे-पिणे सामान्य समजले पाहिजे. काजोल पुढे म्हणाली, 'एकेकाळी आम्ही याबद्दल आनंदाने बोलायचो, पण आता तसे राहिले नाही, शेवटी हा देखील आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, मला वाटत नाही की याशिवाय कोणीही जगू शकते , त्यामुळे मी मानते की याला नॉर्मल करणेच चांगले राहिल. ज्याप्रमाणे आपण खाण्या पिण्यावर चर्चा करतो त्याप्रमाणेच या गोष्टीवर देखील चर्चा व्हायला पाहिजे. त्याबद्दल न बोलल्याने चुकीच्या केसेसची संख्या वाढते. त्यानंतर लोक यावर अटेंशन देतात.
लस्ट स्टोरी २ कधी रिलीज होणार? : या वेब सीरिजमध्ये काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर, कुमुद मिश्रा, अमृता सुभाष, तिलोत्तमा, अगंद बेदी हे महत्त्वाचे कलाकार आहेत, जे आपापल्या वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष आणि अमित शर्मा रवींद्रन या चार दिग्दर्शकांनी या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. ही मालिका उद्या म्हणजेच २९ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. एस वर्मा दिग्दर्शित लोकप्रिय सीबीएस (CBS) शो 'द गुड वाईफ'मध्ये देखील ती दिसणार आहे, जो लवकरच डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :