ETV Bharat / entertainment

Kajol Durga Puja : जुहूच्या सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सवात झळकली काजोल, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - दुर्गा पंडाल

Kajol Durga Puje : अभिनेत्री काजोल मुंबईतील जुहू येथील नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पंडालमध्ये झळकली. यावेळी ती पारंपारिक लूकमध्ये दिसत होती.

Kajol Durga Puja
काजोल दुर्गा पूजा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 11:51 AM IST

मुंबई - Kajol Durga : बॉलिवूडमधील अनेक कलाकार दरवर्षी दुर्गा पूजा पंडालला भेट देऊन मातेसमोर नतमस्तक होतात. दरम्यान दुर्गा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील जुहू येथील बंगाली समाजानं आयोजित केलेल्या नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पंडालमध्ये अभिनेत्री काजोल उपस्थित राहिली. ती दुर्गापूजेसाठी पारंपारिक लूकमध्ये पोहोचली होती. यावेळी काजोलनं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. यावर तिनं मेकअप लाईट केला होता व आपल्या लुकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं केसांचा टॉप नॉट बनवला होता. तिनं लाल रंगाची टिकली, बांगड्या आणि कानातलं घालून तिचा लूक पूर्ण केला, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिनं देवीच्या मूर्तीसमोर खूप फोटो देखील क्लिक केले.

काजोलचे फोटो झाले व्हायरल : काजोलचे दुर्गा पूजेमधील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिनं काका देब मुखर्जीसोबत फोटो क्लिक केले. दरवर्षी जुहू येथे नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजेचं आयोजन काजोलच्या काकाकडून केलं जातं. यावेळी काजोलन तिची चुलत बहीण शरबानी मुखर्जीसोबत दुर्गा पूजा केली. शरबानी मुखर्जीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. यावर तिनं सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. एक व्हिडिओमध्ये या दोघीही दुर्गापूजेत उत्साहानं सहभागी होताना दिसत आहेत. काजोल ही दरवर्षी न चुकता दुर्गा पंडालमध्ये मातेच्या दर्शनाला जात असते.

वर्क्रफंट : काजोलच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर ती रेवती दिग्दर्शित 'सलाम वेंकी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत आमिर खान, रेवती मेनन. आहाना कुमरा. प्रकाश राज, सनी सिंग, राहुल बोस आणि राजीव खंडेलवाल दिसणार आहेत. हा चित्रपट ९ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. काजोल 2020 मध्ये 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'मध्ये मोठ्या पडद्यावर दिसली होती. तेव्हापासून ती नेटफ्लिक्समधील अनेक वेब सीरिजमध्ये झळकली आहे. तिचा 'लस्ट स्टोरीज 2' मालिकेतील भाग खूप गाजला होता. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता आणि अंगद बेदी हे कलाकार होते.

हेही वाचा :

  1. Suhana Khans song Sunoh : सुहाना खानच्या 'सुनोह' गाण्यातून शाहरुख खानला मिळाला 'प्रेरणा'चा डोस
  2. Tiger Shroff visited Siddhivinayak : 'गणपथ' चित्रपट रिलीजनंतर टायगर श्रॉफ सिद्धीविनायकाच्या चरणी लीन
  3. Bigg Boss 17: 'वीकेंड का वार'च्या बिग बॉसमध्ये आधी राडा, नील भट्ट-विकी जैन, अंकिता लोखंडे-खानजादी एकमेकांशी भिडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.