ETV Bharat / entertainment

जेव्हा सुप्रिम कोर्टाचे 'रियल जज' बनतात 'रील' पोलीस इन्स्पेक्टर, जाणून घ्या खरा किस्सा - Real Judge of Supreme Court

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी कादर खान आणि संजय दत्तसोबत 'कानून अपना अपना' या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या निरोप समारंभाला संबोधित करताना ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी ही माहिती उघड केली.

रियल जज बनतात रील पोलीस इन्स्पेक्टर
रियल जज बनतात रील पोलीस इन्स्पेक्टर
author img

By

Published : May 21, 2022, 11:31 AM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (Supreme Court judge ) एल नागेश्वर राव ( L Nageswara Rao ) यांनी बॉलिवूड चित्रपट "कानून अपना अपना" यासह अनेक चित्रपटांमध्ये पोलिस निरीक्षक म्हणून काम केले आहे, असे ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी शनिवारी सांगितले.

सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप राय म्हणाले की, ''न्यायमूर्ती राव यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी कादर खान आणि संजय दत्तसोबत 'कानून अपना अपना' या हिंदी चित्रपटात काम केले आहे,"

न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या निरोप समारंभाला संबोधित करताना ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी ही माहिती उघड केली. ज्येष्ठ वकील प्रदीप राय म्हणाले की, न्यायमूर्ती एलएन राव हे बहुप्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहेत कारण ते खूप चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. वरिष्ठ अधिवक्ता राय यांनी त्यांचे शीर्ष नेते म्हणून वर्णन केले आणि प्रत्येक क्षेत्रात योगदान दिल्याचेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती एलएन राव यांची 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली आणि ते येत्या 7 जून 2022 रोजी निवृत्त होणार आहेत.

हेही वाचा - मीरा चोप्राचे गोल्डन आउटफिटमध्ये कान्समध्ये पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.