मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'देवरा' चित्रपटातील त्याचे फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा साऊथचा चित्रपट आहे, ज्यात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ज्युनियर एनटीआरने स्वत: या चित्रपटातील सैफ अली खानचे फर्स्ट लूक पोस्टर लाँच केले आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रपटामधील हे पोस्टर शेअर करत ज्युनियर एनटीआरने सैफ अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात सैफ हा 'भैरा'च्या भूमिकेत दिसणार आहे. या पोस्टवर एनटीआरने लिहिले, सैफ सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. या पोस्टरमध्ये सैफ लांब केसांमध्ये दिसत आहे. निर्मात्यांनी आधीच एनटीआरचा लूक रिलीज केला होता.
-
BHAIRA
— Jr NTR (@tarak9999) August 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Happy Birthday Saif sir !#Devara pic.twitter.com/DovAh2Y781
">BHAIRA
— Jr NTR (@tarak9999) August 16, 2023
Happy Birthday Saif sir !#Devara pic.twitter.com/DovAh2Y781BHAIRA
— Jr NTR (@tarak9999) August 16, 2023
Happy Birthday Saif sir !#Devara pic.twitter.com/DovAh2Y781
ट्रेंड होत आहे 'भैरा' : दरम्यान आता सैफ अली खान ट्विटरवर ट्रेंड करू लागला आहे. चाहते त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहेत आणि 'देवरा' चित्रपटाच्या पोस्टरचे कौतुकही करत आहेत. गेल्या अनेक चित्रपटांमध्ये सैफच्या वेगवेगळ्या भूमिका सातत्याने पाहायला मिळत आहेत. दक्षिणेतील मोठ्या प्रोजेक्टमध्येही तो सतत दिसतो. या चित्रपटाबाबत खूप चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. ज्युनियर एनटीआरच्या या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहे. कारण एनटीआर देखील या चित्रपटामध्ये वेगळ्या अंदाजात रूपेरी पडद्यावर झळकेल.
'देवरा'ची रिलीज डेट : सैफ अली खान शेवटी प्रभासच्या आदिपुरुषमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने लंकेशची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप वाईटरित्या फ्लॉप झाला होता. 'देवरा' हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी बॉक्स ऑफिवर प्रदर्शित होणार आहे. 'देवरा'बद्दल बोलायचे तर हा चित्रपट अनेक अर्थाने खास आहे. एनटीआर आणि सैफ एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असेल. हा चित्रपट एनटीआर आर्ट्स आणि युवा सुधा आर्ट्सच्या बॅनरखाली बनला असून अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे.
हेही वाचा :