ETV Bharat / entertainment

अयोध्येत निमंत्रण असूनही ज्यु. एनटीआर राममंदिर उद्घाटनात राहणार गैरहजर, जाणून घ्या कारण - एनटीआर राममंदिर उद्घाटनात गैरहजर

JR NTR will not attend ram mandir inauguration:अयोध्येत निमंत्रण मिळूनही 'आरआरआर' स्टार ज्युनियर एनटीआर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. राम चरण, चिरंजीवी, प्रभास आणि रजनीकांत सारखे साऊथचे सुपरस्टार 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

JR NTR
ज्यु. एनटीआर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 5:27 PM IST

मुंबई - JR NTR will not attend ram mandir inauguration: अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. या उद्घाटनाला सेलिब्रिटींपासून ते राजकारणी आणि अनेक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, अनुपम खेरसह अनेक कलाकार आणि रजनीकांत, राम चरण, चिरंजीवी यांसारखे दाक्षिणात्य सितारे प्राण प्रतिष्ठामध्ये सहभागी होण्यासाठी अयोध्येला पोहोचतील. बातमीनुसार आरआरआर स्टार ज्युनियर एनटीआर या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही.

निमंत्रण मिळाल्यानंतरही ज्युनियर एनटीआर राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होऊ शकणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार ज्युनियर एनटीआर त्याच्या व्यस्त शूटिंग शेड्यूलमुळे येऊ शकणार नाही. एनटीआर त्याच्या आगामी 'देवरा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून त्यामुळे तो अयोध्येला जाऊ शकणार नाही. वास्तविक, 'देवरा' चित्रपटाचे निर्माते 5 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आणि त्यामुळे त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त ३ महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत एनटीआरलाही आपला वेळ 'देवरा'च्या शूटिंगमध्येच घालवायचा आहे.

जान्हवी कपूर, सैफ अली खानसारखे स्टार्स एनटीआरच्या 'देवरा'मध्ये दिसणार आहेत. याशिवाय तो हृतिक रोशनसोबत 'वॉर 2' मध्येही दिसणार आहे, ज्यामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या जागी अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि कियारा अडवाणी देखील स्क्रीन शेअर करणार आहेत.

या स्टार्सना मिळाले राम मंदिरात जाण्याचे निमंत्रण - साऊथचे स्टार्स राम चरण, रजनीकांत, प्रभास, चिरंजीवी, यश, धनुष, ऋषभ शेट्टी, मोहनलाल यांना राम मंदिरात आमंत्रित करण्यात आले आहे. तर बॉलिवूड स्टार्समध्ये अमिताभ बच्चन, कंगना, अनुपम खेर,रणवीर-दीपिका, आलिया-रणबीर, अक्षय कुमार अजय देवगणसारख्या स्टार्सचा समावेश असेल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.