ETV Bharat / entertainment

Jr NTR ची जपानमध्ये तुफान क्रेझ, RRR त्रिकुटाच्या स्वागताची जंगी तयारी - Jr NTR latest news

आरआरआरची टीम सध्या जपानमध्ये चित्रपटाच्या थिएटर रिलीजची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युनियर एनटीआर जपानमध्ये दिग्दर्शक एसएस राजामौली आणि सहकलाकार राम चरण यांच्यासोबत आरआरआर प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले आहेत.

Etv Bharat
RRR त्रिकुटाच्या स्वागताची जंगी तयारी
author img

By

Published : Oct 19, 2022, 4:53 PM IST

मुंबई - तेलुगू स्टार ज्युनियर एनटीआर 21 ऑक्टोबर रोजी होणार्‍या दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'आरआरआर'च्या प्रीमियरसाठी त्याच्या कुटुंबासह जपानला जात आहे. या चित्रपटाला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे. संपूर्ण जगात वाहवा होत असलेला हा चित्रपट आता जपानमध्ये रिलीज होत असून या देशात ज्यूनियर एनटीआरचा मोठा चाहता वर्ग आहे.

  • #RRR#naatunaatu ダンスを横浜ディワリでも踊りました!

    超楽しくて、今でも興奮が抜けない。
    最高のステージでした!

    今回7分のダンスパフォーマンスを、構成・指揮してくれた、 @kaketaku85 さんに、大感謝!

    踊るのって、こんな気持ちいんだな!しばらく忘れてたぜ! pic.twitter.com/y7L95M87K2

    — まよ🇮🇳日印つなぐインフルエンサー (@MayoLoveIndia) October 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ज्यू. एनटीआर जपानला येत आहे, ही घोषणा झाल्यापासून प्रचंड चर्चा सुरू असून चाहते त्याला भेटण्यासाठी आणि एकत्र चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, मॅग्नम ओपसने आश्चर्यकारकपणे चांगली कामगिरी केली. ज्युनियर NTR आणि राम चरण मुख्य भूमिकेतील आरआरआर ( RRR) रिलीज झाल्यापासून, बॉक्स ऑफिसवर 1,150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

खरं तर, आरआरआरची संपूर्ण टीम सध्या जपानमध्ये चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीजची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युनियर एनटीआरला हा टप्पा गाठल्याबद्दल खूप अभिमान आणि आनंद आहे. त्याच्या वाटेवर येणाऱ्या सर्व प्रेम आणि कौतुकाने तो भारावून गेला आहे. जपानमधील त्यांचा चाहता वर्ग नेहमीच प्रचंड आणि समर्पित राहिला आहे. त्यामुळे, निःसंशयपणे त्यांना भेटण्याची ही त्याच्यासाठी आदर्श संधी आहे आणि ज्युनियर एनटीआर त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

RRR त्रिकुटाच्या स्वागताची जंगी तयारी
RRR त्रिकुटाच्या स्वागताची जंगी तयारी

या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेत्याने जपानी माध्यमांशी आरआरआर बद्दल संवाद साधला होता. खरं तर, त्यांनी, संवादानंतर, ट्विट केले होते, "जपानी माध्यमांसोबत RRR चा अनुभव पुन्हा अनुभवत आहे. सर्व प्रेम आणि कौतुकाबद्दल धन्यवाद."

व्यावसायिक आघाडीवर, अभिनेता ज्यू. एनटीआर सध्या त्याच्या वाढदिवशी जाहीर झालेल्या दोन महत्त्वाच्या चित्रपटांच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. KGF या प्रचंड यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि कोराटला शिवाचे अनुक्रमे NTR 30 आणि NTR 31 हे दोन चित्रपट आहेत.

हेही वाचा - नोटी बिनोदिनीच्या बायोपिकमध्ये झळकणार कंगना रणौत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.