ETV Bharat / entertainment

Jr NTR says he will quit films : '...तर चित्रपट करणे सोडून देईन', म्हणताच ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांना मोठा धक्का - ज्युनियर एनटीआर चाहत्यांपासून स्वतःला वाचवताना

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आरआरआर स्टार ज्युनियर एनटीआर याने चाहत्यांना त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सबद्दल विचारत राहिल्यास चित्रपट सोडण्याबद्दल मस्करीत सांगितले.

ज्युनियर एनटीआर
ज्युनियर एनटीआर
author img

By

Published : Mar 20, 2023, 6:19 PM IST

हैदराबाद - सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आरआरआर चित्रपटाने 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीतील नाटू नाटू या गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्यानंतर भारतात परतला. अभिनेता ज्युनियर एनटीआर नुकताच अभिनेता विश्वक सेनच्या दास का धमकी या चित्रपटाच्या प्री-रिलीझ कार्यक्रमाला गेला होता. यावेळी त्याने प्रेक्षकांशी संवादही साधला. जेव्हा त्याला आगामी चित्रपटाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने जे वक्तव्य केले त्यामुळे त्याच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला आहे.

कार्यक्रमादरम्यान, चाहत्यांनी त्याला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल विचारले तेव्हा त्याने गंमतीने सांगितले की जर ते सारखे याबद्दल विचारत राहिले तर तो चित्रपट करणे थांबवेल. मी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही. तुम्ही मला वारंवार विचारत राहिल्यास मी चित्रपट करणे सोडून देईन, असे तो म्हणाला. त्यानंतर त्यांनी त्यांना आश्वासन दिले की चित्रपट बनवणे थांबवण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही आणि लवकरच तो पडद्यावर परत येईल. ज्युनियर एनटीआर जान्हवी कपूरसोबत त्याच्या आगामी कोराटला सिवा चित्रपटात दिसणार आहे. रिलीजची तारीख 5 एप्रिल 2024 ठरवण्यात आली आहे.

ऑनलाइन समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये ज्युनियर एनटीआर चाहत्यांपासून स्वतःला वाचवताना दिसत आहे. हे पाहून त्याला सुरक्षा रक्षकांनी बाजूला नेले. ज्युनियर एनटीआर बाहेर पडताच एका चाहत्याने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला कंबरेला धरले. यामुळे सुरुवातीला त्याला धक्काच बसला, मात्र तो फॅन असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सुरक्षा रक्षकांना शांत केले आणि चाहत्यासोबत सेल्फी काढली.

ज्युनियर एनटीआर सह-कलाकार राम चरण, दिग्दर्शक एसएस राजामौली आणि संगीत टीमसह 95 व्या अकादमी पुरस्कारांना उपस्थित राहिला होता. रेड कार्पेटवर केवळ आपण किंवा आरआरआरची टीम नाही तर सर्व देश अभिमानाने चालेल असे उद्गार त्याने काढले होते. जेव्हा ऑस्कर पुरस्कारामध्ये नाटू नाटू गाण्याची गोषणा झाली तेव्हा संपूर्ण टीमने ऑस्करचा हॉल दणाणून सोडला होता. संपूर्ण जगाने या गाण्यावर प्रेम केल्याने टीम भारावून गेली होती.

हेही वाचा - Urvashi Rautela Trolled : उर्वशी रौतेला तिच्या कृत्यांमुळे होत आहे ट्रोल; म्हटले उर्फी जावेदचे क्रिंगी व्हर्जन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.