ETV Bharat / entertainment

John Abraham : जॉन अब्राहमला ढोंगी म्हणत, नेटिझन्सनी फटकारले : वाचा काय आहे प्रकरण...

प्राण्यांच्यावर होणारी हिंसा थांबावी यासाठी संसदेत सुधारणा कायदा तयार करण्यासाठी सर्व खासदारांनी पुढकार घ्यावा, असे आवाहन जॉन अब्रहमने केले आहे. मात्र, काही नेटीझन्सनी त्याच्यावर टीका करत, तो पूर्वी अंडी खात होता, याचा पुरावा शोधून काढला आहे.

John Abraham
जॉन अब्राहम
author img

By

Published : Jul 17, 2023, 5:17 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने भारताचा कायदा बनवण्यात लहभागी असलेल्या सर्व खासदारांसाठी एक संदेश पोस्ट केला आहे. प्राण्यांशी संबंधित क्रूरतेबाबतच्या १९६० च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. यापूर्वी अनेक कृती व प्राण्यांच्या हिताबाबतची तरफदारी केल्यानंतर जॉनने कायद्यातील बदलाबाबत आग्रह धरला आहे. असे असले तरी त्याच्या या निर्णयावर काही नेटिझन्सनी टीकाही करायला सुरुवात केली आहे. जॉन अब्राहम कसा अंड्यांचे सेवन करतो हे दर्शवणाऱ्या जुन्या पोस्ट त्यांनी शोधून काढल्या आहेत.

व्हिडिओची सुरुवात करताना जॉन अब्राहम म्हणाला की, पक्षी मतदान करु शकत नाहीत, किंवा घोडीा कोर्टात जाऊन दाद मागू शकत नाहीत आणि श्वान पत्रकारांना आपल्या अडचणी सांगू शकत नाही. तुम्हाला आवाज आहे, प्राण्यांना नाही. आज तुम्ही यावर बोलण्याची वेळ आली आहे.

प्राणी क्रूरतेबाबतच्या कायद्यात सुधारणा करण्यासंबंधी बील संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणण्याची विनंती जॉनने सर्व खासदारांना केली आहे. एखाद्या घोड्याचा जीव घेण्याची, एखाद्या श्वानावर अॅसिड फेकण्याची किंवा एखाद्या चिमणीला दगड मारण्याची सजा किती तर ५० रुपये. आता खूप झाले. भारताला प्राणी संरक्षण कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. प्राण्याशी संबंधित हिंसा हा लोकांची सुरक्ष आणि ओरोग्याशी संबंधित गंभीर गुन्हा मानला जावा. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आवाहन करताना जॉन म्हणाला की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अ‍ॅनिमल हजबंडरी मिनिस्टर यांना पत्र लिहून या कायद्याबद्दल आग्रह धरा, असे त्याने आवाहन केले आहे.

जॉनने शेअर केलेल्या या व्हडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून दीड लाखाहून अधिक लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओतील जॉनच्या मतांवर नेटिझन्सनी टीकाही करायला सुरुवात केली आहे. 'ही मते व्यक्त करण्यापूर्वी तुम्ही अंडी आणि चिकन तुम्हाला गोड लागत होती त्याचे काय?', असे एकाने म्हटलंय. 'जॉन अब्राहम, ही पोस्ट करण्यापूर्वी तू चिकन आणि बोकड खाणे थांबवले असशील, तू जर तसे केले नसशील तर तो एक खोटारडा आणि ढोंगी माणूस आहेस', असे एकाने म्हटलंय.

हेही वाचा -

१. Bigg Boss OTT 2 day 30 : सलमान खान ऐवजी भारती सिंग आणि कृष्णा अभिषेकने केले बिग बॉस ओटीटी २ची होस्टिंग...

२. Nayanthara Slays In Poster From Jawan : 'जवान'च्या पोस्टरमध्ये चमकत आहे नयनतारा, किंग खान म्हणतो, 'वादळापूर्वीची गर्जना'...

३. Bai Pan Bhari Deva Box Office Collection 17 : 'बाई पण भारी देवा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाडत आहे यशाचे झेंडे...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.