ETV Bharat / entertainment

Jogira Sara Ra Ra postponed : 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर - ogira Sara Ra Ra has been postponed

: 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. कुशन नंदी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज न होता 26 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या संदर्भात निर्मात्यांनी नवीन तारीखही जाहीर केली आहे.

जोगिरा सारा रा रा या चित्रपटाचा रिलीज
Jogira Sara Ra Ra New Release Date
author img

By

Published : May 10, 2023, 12:49 PM IST

मुंबई: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा स्टारर 'जोगिरा सारा रा रा' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण या चित्रपटाचा रिलीज हा पुढे ढकलले गेले आहे. या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र काही अडचणीमुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज लंबणीवर टाकले. हा चित्रपट आता 12 मे ऐवजी 26 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कुशन नंदी दिग्दर्शित 'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटाचे प्रमोशन मंगळवारी दमदार सुरू होते. अचानकच 12 मे रोजी होणाऱ्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली. या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता त्यांना 26 मे पर्यत वाट बघावी लागणार आहे.

चित्रपटाचा रिलीज : चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आणि नवीन तारखेबद्दल माहिती शेअर केली आहे. या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या लक्षात घेऊन २ आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार असे पोस्टद्वारे सांगण्यात आले आहे. शिवाय या चित्रपटामधील अभिनेत्री नेहा शर्माने देखील तिच्या 'जोगिरा सारा रा रा' चित्रपटाविषयाची माहिती तिच्या ट्विटर अकाऊंटद्वारे एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना दिली. तिने म्हटले, 'मला आशा आहे की तुमचा दिवस चांगला जात आहे. तुमच्यासाठी महत्वाची माहिती. आमचा चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित होणार होता, तो आता २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. कृपया तारीख लक्षात घ्या'. असे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले.

नवाबचे कौतुक : जेव्हा या चित्रपटाचा टीजर व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा अनेक प्रेक्षकांनी या व्हिडिओवर केमेंट करत नवाबचे कौतुक केले आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाचा टीजर फार पसंतीला पडला.चित्रपटाचे दिग्दर्शक कुशन नंदी केले आहे. या चित्रपटाचे किरण श्याम श्रॉफ आणि नईम ए. सिद्दीकी हे निर्माते आहेत तर या चित्रपटात मुख्यभूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा पहिल्यांदा एकत्र रूपेरी पड्यावर झळकणार आहे. यांच्याशिवाय संजय मिश्रा आणि जरीना वहाब देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग यूपीमधील लखनौ आणि वाराणसीमध्ये झाले आहे.

हेही वाचा : Adipurush : आदिपुरुषांसाठी प्रभासने घेतली कठोर मेहनत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.