ETV Bharat / entertainment

फ्रान्सच्या न्यू वेव्ह सिनेमाचे जनक जीन लुक गोडार्ड यांचे मंगळवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन

फ्रान्समध्ये लोकप्रिय झालेल्या न्यू वेव्ह सिने चळवळीमुळे जगाला परिचीत झालेल्या चित्रपट दिग्दर्शक जीन लुक गोडार्ड यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जीन लुक गोडार्ड
जीन लुक गोडार्ड
author img

By

Published : Sep 13, 2022, 5:20 PM IST

फ्रान्सच्या न्यू वेव्ह सिनेमाचे गॉडफादर आणि चित्रपट दिग्दर्शक जीनलुक गोडार्ड यांचे मंगळवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. "ब्रेथलेस" आणि "कंटेम्प्ट" सारख्या अभिजात चित्रपटांसाठी ओळखले जाणारे गोडार्ड हे जगातील सर्वात प्रशंसित दिग्दर्शकांपैकी एक होते.

चित्रपट सृष्टीतील गोडार्डची ओळख साठच्या दशकात फ्रान्समध्ये लोकप्रिय झालेल्या न्यू वेव्ह सिने चळवळीमुळे त्यांची ओळख जगभर झाली. गोडार्ड यांनी फ्रान्सच्या मुख्य प्रवाहातील सिनेमावर जोरदार टीका केली. नवीन शैलीवर काम करण्यापेक्षा जुन्या शैलीतील कलाकुसर आणि नवीन चित्रपटांपेक्षा जुन्या चित्रपट निर्मात्यांना प्राधान्य देणे हे त्यांच्या टीकेचे केंद्रस्थान होते. फ्रान्समधील वाद अधिक तीव्र झाला आणि परिणामी जीन-लुक गोडार्ड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली. गोदारच्या अनेक चित्रपटांनी त्यांच्या आशय आणि कलाकुसरातून फ्रेंच तसेच हॉलीवूड सिनेमांसमोर आव्हाने मांडली.

त्याच्या चित्रपटांनी 1960 मधील फ्रेंच सिनेमाच्या प्रस्थापित मर्यादांना तोडले आणि हँडहेल्ड कॅमेरा वर्क, जंप कट आणि अस्तित्त्वात्मक संवादांसह चित्रपट निर्मितीचा एक नवीन मार्ग सुरू करण्यास मदत केली. जीन-लुक गोडार्ड हे सिनेक्षेत्रातील क्रांतीकारक दिग्दर्शक होते. त्यांनी चित्रपट निर्मात्यांना कलाकार बनवले आणि त्यांना उत्कृष्ट चित्रकार आणि साहित्यातील प्रतीकांच्या बरोबरीने आणले.

गोडार्ड यांचा जन्म एका श्रीमंत फ्रँको-स्विस कुटुंबात 3 डिसेंबर 1930 रोजी पॅरिसच्या सातव्या अॅरोन्डिसमेंटमध्ये झाला. त्याचे वडील डॉक्टर होते, त्याची आई स्विस माणसाची मुलगी होती ज्याने बॅंक पारिबास ही तत्कालीन एक प्रसिद्ध गुंतवणूक बँक स्थापन केली होती.

जीन-लुक गोडार्ड यांची 2010 मध्ये ऑनररी ऑस्करसाठी निवड झाली होती पण तो पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. गोडार्डच्या चित्रपटांनी मार्टिन स्कोर्सेसे, बर्नार्डो बर्टोलुची आणि पियरे पाओलो पासोलिनी यांच्यासह त्याच्या अनेक समकालीन आणि नंतरच्या पिढ्यांतील दिग्दर्शकांना प्रभावित केले.

हेही वाचा - पाक क्रिकेटर नसीम शाहने उर्वशी रौतेलाला केले इन्स्टाग्रामवर फॉलोनंतर अनफॉलो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.