ETV Bharat / entertainment

Advance booking : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग.... - अ‍ॅडव्हान्स बुकिंग

Advance booking : शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान' रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर नोटा छापत आहे. 'जवान'चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग देशांतर्गत 1 सप्टेंबरपासून सुरू झालं. आता सध्या सोशल मीडियावर प्री-सेल्सची चर्चा सुरू आहे.

Advance booking
अ‍ॅडव्हान्स बुकिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 3:55 PM IST

मुंबई Advance Booking : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत. या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग खूप झपाट्याने होत आहे. 1 सप्टेंबरपासून या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली होती. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं जबरदस्त कमाई केली. अवघ्या 24 तासांत या चित्रपटानं तिकिट विक्रीमध्ये 10 कोटीचा टप्पा पार केला आहे. दरम्यान आता 'जवान'च्या हिंदी आवृत्तीसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुमारे 5,41,126 इतकी झाली आहे. यासह या चित्रपटानं 15.59 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तमिळ आवृत्तीसाठी 19,899 तिकिटे विकली गेली, तर तेलुगु आवृत्तीमध्ये 16,230 तिकिटांची विक्री झाली आहे. 'जवान'नं अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये देशांतर्गत 16.93 कोटीची कमाई केली आहे.

  • CONFIRMED: #Jawan is all set to be #ShahRukhKhan’s second ₹ 100cr+ worldwide opener.

    The overseas presales are simply astounding. Will post the T-3 nos tomorrow. #SRK is the 1st Bolly Actor to have ₹ 100cr+ ww opening in his kitty.
    Now two. Both, in the same year. Mass. 🔥 pic.twitter.com/GIXD6KgJyZ

    — Nishit Shaw (@NishitShawHere) September 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'जवान'ने रिलीजपूर्वीच केली जबरदस्त कमाई : 'जवान'च्या आश्चर्यकारक प्री-सेल्समुळे हा चित्रपट 100 कोटी रुपयांची ओपनिंग करू शकतो, असा दावा केला जात आहे. पठाणनंतर किंग खानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे. शाहरुखचा 'जवान' चित्रपट ब्लॉकबस्टर होणार असं सध्या दिसत आहे. आधीच अनेक चित्रपटगृहांमध्ये शो हाऊसफुल्ल झाले आहेत. त्याचबरोबर 'जवान' हा बॉलिवूड चित्रपटांसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक प्री-सेल चित्रपट ठरला आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित हा चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'जवान' हिंदीसह तमिळ आणि तेलुगु भाषांमध्ये रिलीज होईल.

जवानला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद : या चित्रपटामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा आणि विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा आणि संजय दत्त हे कलाकार दिसणार आहेत. 'जवान'च्या प्रमोशनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 31 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या ट्रेलरला यूट्यूबवर 41 दशलक्षाहून अधिक चाहत्यांनी पसंती दिली आहे. तसंच 'जवान' चित्रपटामधील गाण्यांना देखील चाहते पसंत करत आहेत. सध्या सोशल मीडियावर जवान चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. Kushi BO Collection Day 2: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू स्टारर 'खुशी'ने केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई....
  2. Chandramukhi 2 Trailer Released : कंगना रणौतच्या आगामी 'चंद्रमुखी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...
  3. Kartik Aaryan hugged His Ex Sara Ali Khan: 'गदर 2'च्या पार्टीत कार्तिकनं एक्स गर्लफ्रेंड साराला मारली मिठी , व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.