मुंबई- Janhvi Kapoor and Shikhar Pahariya : जान्हवी कपूर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनेकदा जान्हवी कपूर कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत स्पॉट झाली आहे. डेटिंगच्या अफवांमध्ये जान्हवी आणि शिखर लंच डेटवर देखील एकत्र दिसले होते. दरम्यान सोशल मीडियावर एक रील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिखर एका मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. जान्हवी त्याला चिडवत म्हणते, 'कोण आहे ही गुलाबी मुलगी?' त्यानंतर ओरहान अवत्रामणीनं त्याच्या बोलण्यात हस्तक्षेप करून एका मुलीला टॅग करत, 'पळा' लिहतो. या पोस्टवर शिखरनं कमेंट करत जान्हवीला म्हटल, 'मी पूर्णपणे तुझा आहे'. या पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप झपाट्यानं व्हायरल होत आहे.
जान्हवी आणि शिखर पहाडियाचा व्हिडिओ व्हायरल : जान्हवी आणि शिखरचा लंच डेटवरचा देखील व्हिडिओ आता चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवीनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यावर तिनं तिचा मेकअप लाईट ठेवला आहे. याशिवाय तिनं केस मोकळी सोडलेत. जान्हवीसोबत तिची बहिण खुशी कपूर देखील दिसतेय. तिनं पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस घातलाय. दुसरीकडे शिखरनं तपकिरी रंगाचा शर्ट आणि निळा डेनिम जीन्स परिधान केला आहे. जान्हवी आणि शिखरला एकत्र पाहून हे कपल एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. याआधी जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये एकत्र दिसले होते. या कार्यक्रमात त्यानं बोनी कपूरसोबत फोटो देखील काढले होते.
-
Janhvi Kapoor seen on a lunch date with her boyfriend Shikhar Pahariya.💞#janhvikapoor #shikharpahariya #lovebirds #lunchdate #bollywoodactress #love pic.twitter.com/bykiGeoPFJ
— bollywood Apna (@Bollywood_Apna) November 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Janhvi Kapoor seen on a lunch date with her boyfriend Shikhar Pahariya.💞#janhvikapoor #shikharpahariya #lovebirds #lunchdate #bollywoodactress #love pic.twitter.com/bykiGeoPFJ
— bollywood Apna (@Bollywood_Apna) November 5, 2023Janhvi Kapoor seen on a lunch date with her boyfriend Shikhar Pahariya.💞#janhvikapoor #shikharpahariya #lovebirds #lunchdate #bollywoodactress #love pic.twitter.com/bykiGeoPFJ
— bollywood Apna (@Bollywood_Apna) November 5, 2023
मनीष मल्होत्राच्या पार्टीत लावली हजेरी : जान्हवीसोबत डेटवर दिसण्याव्यतिरिक्त, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीत जान्हवी आणि शिखर एकत्र दिसले होते, या दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही जास्त प्रेमाची केमिस्ट्री दिसत होती. जान्हवी कपूरचा वर्क फ्रंट बोलायचं झालं तर ती नुकतीच वरुण धवनसोबत 'बवाल' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. याशिवाय ती 'मिली', 'गुडलक जेरी', 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
हेही वाचा :