मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नुश्रत भरुच्चा ( Nushrratt Bharuccha ) अभिनीत जनहित में जारी ( trailer of Janhit Mein Jaari ) या चित्रपटाच्या ट्रेलरचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. नुश्रतची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मध्य प्रदेशातील एका मुलीची कथा आहे. विनोदी पद्धतीने सादर करण्यात आलेल्या या 'जनहित में यारी' ट्रेलरमध्ये सामाजिक विरोध असूनही उदरनिर्वाहासाठी कंडोम विकणाऱ्या तरुण मुलीचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
नुश्रतसह या चित्रपटात अनुद सिंग, टिन्नू आनंद, विजय राज आणि परितोष त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत. जय बसंतू सिंग दिग्दर्शित, जनहित में जारी या चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, विशाल गुरनानी, राज शांडिल्य, विमल लाहोटी, श्रद्धा चंदावरकर, बंटी राघव आणि राजेश राघव यांनी केली आहे आणि जुही पारेख मेहता सह-निर्मित आहेत.
हेही वाचा - प्रती Srk ला आहे 'किंग खान'ला भेटण्याची इच्छा पाहा त्याचे हुबेहुब फोटो