ETV Bharat / entertainment

Jailer Twitter review: चाहत्यांकडून 'जेलर' ब्लॉकबस्टर घोषित, दिग्दर्शकावरही कौतुकाचा वर्षाव - Rajinikanths film Jailer

'जेलर' चित्रपटाच्या रिलीजनंतर रजनीकांतची क्रेझ आजही किती जबरदस्त आहे हे पाहायला मिळाले. चित्रपटाचा पहिला शो सकाळी ६ वाजता सुरू झाला आणि अफाट उत्साहात, खचाखच भरलेल्या थिएटर्समधून थलैयवाचा जलवा पाहायला मिळाला.

Jailer Twitter review
चाहत्यांकडून 'जेलर' ब्लॉकबस्टर घोषित
author img

By

Published : Aug 10, 2023, 1:36 PM IST

मुंबई - नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित रजनीकांत स्टारर 'जेलर' चित्रपट वाजत गाजत चित्रपटगृहात दाखल झाला आहे. दोन वर्षानंतर रिलीज होणारा सुपरस्टार रजनीकांतचा त्याच्या पहिल्या चित्रपटाचा प्रीमियर दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृहाबाहेर ढोल, फटाके आणि बॅनरसह साजरा केला गेला. मोठ्या पडद्यावर रजनीकांतच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी थिएटरबाहेर रांगा लावल्यामुळे पहिल्या दिवसाचा पहिला शो खचाखच भरलेला होता. चित्रपट पाहिल्यानंतर असंख्य प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटरवर शेअर केल्या आहेत.

राज्य सरकारच्या नियमांचे पालन करुन जेलरचा पहिला शो सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा पासून हॅशटॅग 'जेलर' ट्विटरवर ट्रेंड करत आहे. रजनीकांतच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी करून त्याची एन्ट्री होताच जल्लोषात आणि नृत्य करत थिएटर डोक्यावर घेतल्याचे चित्र अनेक थिएटर्समध्ये पाहायला मिळाले.

  • #Jailer flash back portions was one of the major highlight & enjoyed it to the max👌🤩
    Superstar #Rajinikanth getup was a total surprise & his Commendable role peaked there❤️‍🔥
    HUKUM !!

    — AmuthaBharathi (@CinemaWithAB) August 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोठ्या पडद्यावर रजनीकांतला पाहण्यासाठी झालेली अलोट गर्दी सुपरस्टारवरील प्रेम दाखवणारी होती. चित्रपटात रजनीकांतने किती जबरदस्त कामगिरी केली आहे, याची वर्णने चाहते करत आहेत. काहींच्या मते, चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे ते म्हणजे मध्यांतर आणि क्लायमॅक्स. नेल्सन दिलीपकुमारचा गेल्या वर्षी रिलीज झालेल्या बीस्ट चित्रपटापेक्षा 'जेलर' अधिक उत्कृष्ट असल्याचे अनेकांनी म्हटलंय.

अनिरुद्ध रविचंदरची गाणी आणि संगीत हा चित्रपटाचा आणखी एक प्रक्षकांना आवडलेला उत्कृष्ट पैलू आहे. कावला आणि हुकूम सारख्या गाण्यांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे आपण पूर्वी पाहिले होते. मॅथ्यूच्या भूमिकेत असलेले मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि खलनायक म्हणून शिवराजकुमार यांच्या जोडीने या हिट चित्रपटाला एक वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. एकंदरीत 'जेलर'ला खूप सकारात्मक प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.

रजनीकांतच्या समर्थकांनी त्याच्या नवीन 'जेलर' चित्रपटाचे केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह इतर अनेक परदेशी राष्ट्रांमध्ये विशेष जल्लोषासह स्वागत केले. आजच्या रिलीजनंतर जगभर पसरलेले रजनीकांतचे चाहते बेभान झाले आहेत आणि त्यांनी चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटले आहे.

  • #Jailer review (THREAD) 🎬

    POSITIVES-

    - Two men, Rajinikanth & Anirudh literally carried the film all the way 🫡🔥

    - Villain characterization was better this time

    - Interval block 🥵

    - Cameo’s were a banger & that climax smoking shot of all 3 of them was a paisa vasool 🥶❤️‍🔥 pic.twitter.com/dbnTzjMobM

    — 𝙎𝘼𝙈𝙐𝙀𝙇 ✨ (@itsnot_samhere) August 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रजनीकांतच्या एका चाहत्याने ट्विट केले: ''जेलर' चित्रपटातील फ्लॅश बॅक भाग हे मुख्य आकर्षणांपैकी एक होते आणि त्याचा जास्तीत जास्त आनंद घेतला. सुपरस्टार रजनीकंतचा गेटअप चकित करणारा आहे. त्याने ही भूमिका एका शिखरावर पोहोचवली आहे.'

आणखी एकाने लिहिले: फक्त चित्रपट भव्य बनवण्यासाठी रजनीकांतला चित्रपटात घेतले आहे असे समजू नका, चित्रपटातील त्याचे सीन्स खूप प्रभावी आहेत. नेल्सन, मोहनलाल यांनी आपली कामगिरी उत्तम केली आहे.

- रजनीकांत आणि अनिरुद्ध या दोन व्यक्तींनी चित्रपट अक्षरशः आपल्या खांद्यावरुन पार केला आहे.

- यावेळी खलनायकाची व्यक्तिरेखा जबरदस्त होती.

- इंटरव्हल ब्लॉक.

- मोहनलालचे कॅमिओ धमाकेदार होते आणि त्यातील सर्व 3 चा क्लायमॅक्स स्मोकिंग शॉट पैसा वासूल होता.

'जेलर' या चित्रपटामुळे रजनीकांत दोन वर्षांनी चित्रपटसृष्टीत परतले आहेत. यातील रजनीची भूमिका पोलिसांच्या वडीलांची आहे. हा चित्रपट एक जबरदस्त अ‍ॅक्शन-एंटरटेनर चित्रपट आहे ज्यात स्टार्सची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -

१. Gadar 2 Low Budget Movie : 'गदर २' चित्रपटासाठी सनी देओलने घेतली कमी फी ; अनिल शर्माने केला खुलासा...

२. Rajinikanth's Jailer Releases Today : 'जेलर' जगभरात ४००० स्क्रीन्सवर रिलीज, जपानी जोडपे चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईत दाखल

३. Kushi trailer launch: 'खुशी'साठी सामंथाची कितीही प्रतीक्षा करण्यास तयार होता विजय देवराकोंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.