मुंबई : सनी देओलचा 'गदर २' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असताना, रजनीकांतचा 'जेलर' देखील रूपेरी पडद्यावर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट रोजच नवे रेकॉर्ड बनवत आहे. चाहते रजनीकांतला भरभरून प्रेम देत आहेत. या चित्रपटाने स्वातंत्र्यदिनी तब्बल ३३ कोटींची कमाई केली होती. दरम्यान आता 'जेलर' चित्रपटाच्या सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. सातव्या दिवशी 'जेलर'ने जबरदस्त कमाई केली आहे. तसेच जगभरात देखील हा चित्रपट धुमाकूळ घातल आहे. जेलरचे दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी खूप खास चित्रपट बनवला आहे. 'जेलर'ने तिकीट काउंटरवर चांगली कामगिरी करत मोठे लक्ष्य गाठले आहे.
'जेलर'ने रिलीजच्या सातव्या दिवशी केली इतकी कमाई : रजनीकांतने दोन वर्षांनी 'जेलर'मधून पुनरागमन केले आहे. त्याचा हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर हिट ठरला. 'जेलर'मध्ये प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारे उत्कृष्ट डायलॉग आणि आयटम सॉंग आहे. दरम्यान सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या सातव्या दिवशी जेलरच्या कमाईत थोडी घट झाली आहे. या चित्रपटाने ७व्या दिवशी १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. याआधी मंगळवारी 'स्वातंत्र्य दिनी' या चित्रपटाने ३६ कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता. रजनीकांतच्या 'जेलर'ची सात दिवसांत एकूण कमाई २०० कोटींच्या पुढे गेली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण २२५.६५ कोटींचा व्यवसाय केला आहे. तसेच 'जेलर'ने जगभरात ४०० कोटीचा टप्पा ओलांडला आहे.
'जेलर'ची स्टारकास्ट दमदार : रजनीकांत व्यतिरिक्त या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि कन्नड स्टार शिवा राजकुमार यांचाही 'कॅमिओ' आहे. तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, प्रियांका मोहन, योगी बाबू, वसंत रवी आणि विनायकन यांनी या चित्रपटात आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवले आहे. भारताव्यतिरिक्त 'जेलर' अमेरिका, यूएई, सिंगापूर आणि मलेशियामध्येही चांगली कमाई करत आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत, 'जेलर'ने 'गदर २'ला मागे टाकले आहे. 'जेलर'ची कमाई हिंदीपेक्षा तामिळ भाषेत जास्त झाली आहे.
हेही वाचा :