ETV Bharat / entertainment

Jai Ganesha song from Ganpath : टायगर श्रॉफच्या 'गणपथ'मधील जय गणेशा गाणे रिलीज - Jai Ganesha song from Tiger Shroffs Ganpath

टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या गणपथ चित्रपटाचे गाणे रिलीज करण्यात आलंय. जय गणेश असे शीर्षक असलेले हे गीत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रिलीज झाले. दरम्यान चित्रपटाचे नवो पोस्टरही निर्मात्यांनी शेअर केलंय.

Jai Ganesha song from Ganpath
'गणपथमधील जय गणेशा गाणे रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 4:10 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'गणपथ : हिरो इज बॉर्न' चित्रपटचाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. पाच भाषामध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पोस्टर प्रदर्शित झाले आहे. याला जोडूनच झी म्यूझिकने जय गणेशा या गाण्याचा ऑडिओही रिलीज केला आहे. दसऱ्याच्या काळात हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'गणपथ'मधील जय गणेशा हे गाणे संगीतकार विशाल भारद्वाजने संगीतबद्ध केले असून अक्षय त्रिपाठीने लिहिलेल्या या गाण्याला विशाल मिश्राने स्वरसाज चढवला. गणेश उत्सवाच्या सुरुवातीलाच रिलीज झालेले हे गीत उत्सवाच्या काळात लोकप्रिय होईल ही अपेक्षा निर्मात्यांनी बाळगल्याचं दिसतं.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

फिल्म ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी गणपथ चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या चित्रपटात भरपूर अ‌ॅक्शन चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.नव्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ आक्रमक अवतारात दिसत आहे. बॉक्सिंग रिगमध्ये तो उतरलेला दिसतो. त्याचे समर्थक त्याला चिअर्स करताना पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेत. तर त्याचा हँड ग्लोजला आग लागल्याचेही पोस्टरमध्ये दिसतंय.

विकास बहल दिग्दर्शिन करत असलेला 'गणपथ हा' चित्रपट टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी खूप प्रतीक्षित आहे. वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेन्मेंट आणि गुड कंपनी या प्रॉडक्शन हाऊससाठी केली आहे.

'गणपथ' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर - टायगर श्रॉफचा गणपथ आणि भूषण कुमार यांचा यारिया दोन चित्रपट २० ऑक्टोबरला रिलीज होत आहेत. याच दिवसी कंगना रणौतने आपला महत्त्वकांक्षी 'एमर्जन्सी'चित्रपट रिलीज करण्याचं ठरवलं होतं. मात्र या दोन चित्रपटाशी पंगा घेणं परवडणार नसल्याचे तिने चित्रपटाचे रिलीज एक महिन्यांनी पुढं ढकललंय.

दरम्यान, टायगर श्रॉफच्या 'बागी 4' या चित्रपटाची घोषणा झाली आहे. 'बागी 4'चे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी नुकतीच याबाबत माहिती दिलीय.तसेच टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2'चे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटांबद्दल आपल्याला बर्‍याच अ‍ॅक्शन्स पाहायला मिळतील.

हेही वाचा -

१. Khufiya Trailer Out : तब्बू आणि अली फजल स्टारर 'खुफिया'चा ट्रेलर झाला प्रदर्शित...

२. Shilpa Shetty bring Bappa home : शिल्पा शेट्टीच्या घरी गणेश उत्सवाची तयारी, बाप्पाच्या मूर्तीचे घरी आगमन

३. Nayanthara : नयनतारानं पती विघ्नेश शिवनसह स्विमिंग पूलमध्ये केला एन्जॉय ; फोटो झाला व्हायरल...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.