मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी रोमँटिक-फॅमिली ड्रामा चित्रपट 'जरा हटके जरा बचके'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या शहरांना भेट देऊन तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात ती अभिनेता विकी कौशलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे साराने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपली सर्व ताकद लावली आहे. आता अभिनेत्रीने प्रमोशन दरम्यान तिने अनेक राज्यतील पदार्थ चाखले आहेत आणि तिच्या चाहत्यांना त्याची झलकही तिने दाखवली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'जरा हटके जरा बचके' चित्रपटाचे प्रमोशन : 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित तिच्या नवीन व्हिडिओमध्ये, साराने विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ सादर केले आहेत आणि त्यांचा एक-एक या सर्व पदार्थाचा ती आस्वाद घेतला आहे. सारा कधी मिठाई तर कधी स्नॅक्स अशा तोंडाला पाणी आणणाऱ्या गोष्टी चाखून चाहत्यांना दाखवत आहे. हा व्हिडीओ शेअर करून सारा अली खान लिहिते की, 'जेव्हा तुम्हाला एवढे जेवण मिळते, मग दुसरे काय हवे? या व्हिडिओमध्ये सारा अली खान देसी लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने हलक्या रंगाचा सूट परिधान केला आहे. केस दोन भागात विभागले असून मोकळे सोडले आहे. साराचा चेहऱ्यावर शार्प मेक-अप असून ती या लूकमध्ये एकाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विकी आणि सारा पहिल्यांदा दिसणार रूपेरी पडद्यावर एकत्र : विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर हा पहिलाच चित्रपट आहे. ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. चित्रपटाच्या कहानीबद्दल बोलायचे झाले तर, हा एका मध्यमवर्गीय विवाहित जोडप्याच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे, जो दैनंदिन गरजा पूर्ण न केल्यामुळे घटस्फोटापर्यंत पोहोचतात. आता या जोडप्याचा घटस्फोट होतो की नाही, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात, घटस्फोटामुळे दोन्ही कुटुंबांची स्थिती वाईट स्थिती कशी निर्माण होते हे दाखविले आहे, तसेच या चित्रपटात कॉमेडीचीही भर पडणार आहे. या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण उतेकर यांनी केली आहे. हा चित्रपट २ जून रोज सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा : Naseeb Se Song Out: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा' मधील 'नसीब से' गाणे रिलीज