नवी दिल्ली - अभिनेता अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला. यामध्ये त्यानं जसवंत सिंग गिल या प्रसिद्धीपासून अलिप्त राहिलेल्या वास्तव जीवनातील नायकाची भूमिका साकारली होती. 'कोळशाच्या खाणीत काम करणारे 71 कामगार खाणीत साडेतीनशे फूट खाली अडकले होते. त्यावेळी सरदार जसवंत सिंग गिल हे त्या खाणीवर अभियंता म्हणून कार्यरत होते. त्या प्रसंगी फ्रान्स आणि ब्रिटनमधूनही काही लोक तिथं हजर होते. ते सर्व म्हणाले की, त्यांना बाहेर काढणे अशक्य आहे. आतापर्यंत त्यातलं कोणी जिवंतही राहिलं नसंल, कारण कार्बन डायऑक्साइड सॉर्टेड फिलिंगने खाली जवळजवळ ट्रिलियन गॅलन पाणी भरलं होतं', असं अक्षय कुमारनं एएनआयला सांगितलं.
तो पुढे म्हणाला, 'मग तिथं एक माणूस येतो, त्यानं ठरवलं की मी त्यांना वाचवणार आहे. खाणीत जाणं म्हणजे मृत्यला जवळ करणं होतं. तरही तो खाली गेला आणि एकेकाला बाहेर काढलं. सर्वांना वाचवून अखेरीस तो बाहेर आला. मी अनेक चित्रपट केले आहेत, हा चित्रपट कदाचीत व्यावसायिक यश मिळवू शकणार नाही, परंतु मी तुम्हाला सहज सांगतो की, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट आहे. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक प्रामाणिक चित्रपट बनवला आहे.'
अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्य' हा चित्रपट ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी केली आहे. दिवंगत खाण अभियंता जसवंत सिंग गिल यांच्या सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे ज्यांनी भारताच्या पहिल्या यशस्वी कोळसा खाण बचाव मोहिमेचे नेतृत्व केले होतं.
अक्षयने यापूर्वी दिग्दर्शक टिनू सुरेश देसाई यांच्यासोबत 'रुस्तम' या क्राईम थ्रिलर चित्रपटासाठी काम केले होते. दरम्यान, अक्षय कुमार 'सूरराई पोत्रू' या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही वाचा -
2. Aparshakti's Turning Point Of Life: रेडिओ स्टेशनवरुन बोलवणं आलं आणि अपारशक्ती खुरानाचा आयुष्यच बदललं
3. Sunny Deol : रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेत झळकणार सनी देओल ?