मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत खूप नाव कमविले आहे. फार कमी वयात तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली. बॉलीवूडमध्ये 'गंगूबाई' म्हणून तिची एक नवीन ओळख बनली आहे. , 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर हिट ठरला त्यामुळे आलियाचे फार कौतुक केले गेले होते. 'हायवे' सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर ती बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे. आलिया भट्टचे खूप चाहते आहेत. २०२०मध्ये, 'अॅड-ए-मम्मा' हा ब्रँड लॉन्च करून आलिया भट्ट उद्योजक बनली. आता आलिया या ब्रँडला विकू इच्छित असल्याची बातमी समोर आली आहे.
ईशा अंबानी खरेदी करणार आलियाचे ब्रँड : मुकेश आणि ईशा अंबानी आलिया भट्टकडून मुलांचे कपडे बनवणारी 'अॅड-ए-मम्मा' कंपनी खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. आलिया भट्टचा ब्रँड ३०० ते ३५० कोटी रुपयांच्या मोठ्या डीलमध्ये खरेदी करण्याचा विचार ईशा करत आहे. २०२०मध्ये सुरू केलेल्या 'अॅड-ए-मम्मा' ब्रँडला ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 'अॅड-ए-मम्मा'चे बहुतांश ग्राहक ऑनलाइन आहेत. अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहक आलिया भट्टच्या ब्रँडची उत्पादने चांगल्या पद्धतीने पाहू शकतात. मुकेश आणि ईशा अंबानी मुलांच्या कपड्यांच्या बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी एक ठोस पाऊल म्हणून 'अॅड-ए-मम्मा' कंपनी खरेदी करण्याचा विचारात दिसत आहे. 'अॅड-ए-मम्मा'मध्ये ४ ते १२ वयोगटातील मुलांसाठी खास उत्पादने आहेत.
रिलांयन्स रिटेलची नवीन सीईओ ईशा अंबानी : मीडिया रिपोर्टनुसार या सात ते दहा दिवसांत ही डिल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला आलिया भट्टने या कंपनीची किंमत सुमारे १५० कोटी ठेवली होती. या कंपनीची किंमत ईशा आणि मुकेश अंबानी यांनी ३०० ते ३५० कोटी देऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, मुकेश अंबानीने ईशा अंबाला रिलांयन्स रिटेलची नवीन सीईओ म्हणून घोषित केले आहे. दरम्यान त्यावेळी कंपनीचा उलाढाल दोन लाख कोटी रुपये होता. रिलांयन्स रिटेलचे मूल्य सध्या सुमारे ९,१८००० कोटी रुपये आहे.
हेही वाचा :