मुंबई - Raveena Tandon shares cryptic note : 'द आर्चिज' चित्रपटाच्या रिलीजनंतर अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांची खिल्ली उडवणारी पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने ही पोस्ट नजर चूकीनं लाईक केली होती. त्यानंतर तिच्यावर काहीजणांनी भरपूर टीका करत ट्रोलही केले होते. आता रवीनाने एक संदेश लिहून या ट्रोलर्सचा क्लास घेतला आहे.
रवीनाने एक नोट पोस्ट केली आहे की, "पसंत असो वा नसो, कधी कधी काहीही न करताही तुम्हाला खूप काही सहन करावे लागते." या संदेशासोबत तिनं कॅप्शन दिलं होतं, "हे कर्माचं फळं आहे का?." काही गोंधळलेल्या चाहत्यांनी प्रश्नांसह संदर्भ शोधले असताना, एकानं विचारले, "या काय म्हणत आहेत हे कोणी स्पष्ट करू शकेल का??" इतरांनी कमेंटमध्ये आश्वासक शब्द दिले. एका युजरने इशारा दिला, "तुम्हालाच माहीत असेल तर माहीत असेल!!" दुसर्या एका कमेंटने कर्माच्या पैलूवर प्रकाश टाकला आणि म्हटले, "हे कर्माच्या फेऱ्याविषयी आहे... जे कर्म केले गेले त्यासाठी सहन करणे आवश्यक आहे... जरी अजाणतेपणी केलं गेलं असले तरीही, सहन करणे आवश्यक आहे."
अधिक माहिती करता सांगायचे तर, रवीनाला यापूर्वी 'द आर्चीज' नावाच्या नेटफ्लिक्स चित्रपटातील अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांच्या अभिनय कौशल्याची खिल्ली उडवणारी सोशल मीडिया पोस्ट 'चुकून' लाईक केल्याबद्दल प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता. रवीनाच्या 'लाइक'मुळे लक्ष वेधून घेतलेल्या पोस्टमध्ये "अभिनय करतानाच आर्चीजचा मृत्यू झाला" असा मजकूर होता.
त्यानंतर, अनेक इंटरनेट युजर्सनी रवीनाला तिची मुलगी राशा थडानीच्या आगामी बॉलिवूड पदार्पणाची आठवण करून दिली. या घटनेला उत्तर देताना, रवीनाने तिच्या X खात्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ''सोशल मीडियावरील टच बटन दाबल्यामुळे एक चूक घडली आहे. अशी चूक होऊ शकते याची मला जाणीवही नव्हती. यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी मनापासून दिलगीरी व्यक्त करते. ''
वर्क फ्रंटवर रवीना टंडन या वर्षी जुलैमध्ये ओटीटी रिलीज झालेल्या 'वन फ्रायडे नाईट'मध्ये शेवटची दिसली होती. 'वेलकम टू द जंगल' या आगामी चित्रपटासाठी दोन दशकांनंतर अक्षय कुमारसोबत ती पुन्हा एकत्र काम करत आहे. हा 'वेलकम' चित्रपट मालिकेचा तिसरा भाग आहे. संजय दत्तसोबत तिचा आगामी 'घुडचडी' सिनेमाही येत आहे.
हेही वाचा -
1. अभिनेता श्रेयस तळपदेवर हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी, हॉस्पिटलने कोणती दिली माहिती?
2. 'लुट पुट गया' गाण्यावर थिरकला ख्रिस गिल, शाहरुख खाननं केलं त्याच्या कोरिओग्राफीचं कौतुक
3. शुटिंगनंतर श्रेयस तळपदेला उच्च रक्तदाबाचा त्रास, रुग्णालयात उपचार सुरू