ETV Bharat / entertainment

शाहरुख खानच्या जवानमध्ये झळकणार थलपती विजय? ऍटलीच्या पोस्टमुळे चाहत्यांची उत्कंठा शिगेला - शाहरुख खानआणि थलपती विजय

बॉलिवूड स्टार शाहरुख खान स्टारर 'जवान' हा अलीकडच्या काळात सर्वाधिक चर्चेत असलेला हा चित्रपट आहे. दाक्षिणात्य यशस्वी दिग्दर्शक ऍटली यांच्या या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याचीही भूमिका असल्याची जोरदार चर्चा आहे.

Etv Bharat
शाहरुख खानच्या जवानमध्ये झळकणार थलपती विजय?
author img

By

Published : Sep 23, 2022, 5:12 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार शाहरुख खान स्टारर 'जवान' हा अलीकडच्या काळातील सर्वात जास्त अपेक्षित चित्रपट बनला आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याचीही भूमिका असल्याची जोरदार चर्चा आहे.

शनिवारी, ऍटलीने आपल्या ट्विटर हँडलवर दोन सुपरस्टार्सची एक झलक टाकली आणि त्याला कॅप्शन दिले, ""माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी आणखी काय विचारू शकतो, माझ्या मतानुसार आतापर्यंतचा सर्वोत्तम वाढदिवस आहे. माझे प्रिय शाहरुख सर आणि थलपती विजय." या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की थलपती विजय देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

एका चाहत्याने टिप्पणी केली, "एक प्रतिष्ठित चित्र! थलपती विजय आणि शाहरुख खान हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील दोन सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. ब्लॉकबस्टर नंतर ब्लॉकबस्टर, अतुलनीय सुपरस्टारडम आणि कधीही न संपणारी क्रेझ. ." दुसर्‍याने शेअर केले, "रोलेक्स पोहोचला. आता विजयने कॅमिओ स्वीकारला आहे. प्रेरणादायी." "मला यावर विश्वास बसत नाही. हे खरे आहे का? कृपया पुष्टी करा", असे एका चाहत्याने प्रश्न केला.

इंटरनेटवर 'बीस्ट' स्टारच्या अफवा उडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सोशल मीडियावर 'दोघांचा' एक फोटो फिरत होतेा ज्यामध्ये शाहरुख पांढरा शर्ट घातलेला होता आणि विजय जांभळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसला होता. दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अॅटली कुमार दिग्दर्शित, 'जवान' हा चित्रपट गौरी खान निर्मित आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटची प्रस्तुती आहे.

शाहरुखने शेअर केलेल्या चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरने विशेषत: किंग खानच्या अनोख्या लुकने आधीच जोरदार चर्चा निर्माण केली आहे. 'जवान' 2 जून 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. खान सध्या इतर दोन प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे - सिद्धार्थ आनंदचा दीपिका पदुकोणसोबत 'पठाण' आणि तापसी पन्नूच्यासोबत राजकुमार हिरानीचा 'डंकी' हे ते दोन चित्रपट आहेत.

हेही वाचा - आईच्या हत्येप्रकरणी रिव्हरडेल फेम अभिनेता रायन ग्रँथमला मिळाली जन्मठेपेची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.