मुंबई - Ira Khan Nupur Shikhare Wedding : अभिनेता आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत आज महाराष्ट्रीयन पद्धतीनं विवाह होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर नुपूरनं काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोद्वारे नुपूरनं आयरावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा खान ही दीर्घकाळपासून नुपूर शिखरे डेट करत होती. लग्नाच्या फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयरा खानचं लग्न : नूपुरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रोमँटिक पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ''मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'. शेअर केलेल्या तीनपैकी एका फोटोमध्ये नुपूर आणि आयरा खान हसताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये आयरा नुपूरला खाऊ घालतेय. तिसऱ्या फोटोमध्ये नुपूर हा आयरा खाऊ घालत आहे. या फोटोमध्ये हे जोडपे खूप सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये, नुपूरनं मॅचिंग जॅकेटसह लाल कुर्ता आणि सोनेरी बॉर्डर असलेला पिवळी पगडी घातलेला दिसत आहे. दुसरीकडे, आयरानं लाल साडी नेसली आहे. यावर तिनं केसं मोकळी सोडली आहेत. याशिवाय तिनं मोठी लाल टिकलीदेखील लावली आहे. फोटोत हे जोडपे अप्रतिम दिसत आहे.
मुंबईत होणार रिसेप्शन : लग्नापूर्वी या जोडप्याचा 'हळदी'चा सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही फोटो देखील सुंदर होती. दरम्यान या जोडप्याच्या लग्नात चित्रपटसृष्टीतले सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयरा आणि नुपूर लग्नानंतर मुंबईत भव्य रिसेप्शन देणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाचं रिसेप्शन 10 जानेवारीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयरा आणि नुपूरचा साखरपुडा 18 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. त्यांनी मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. या कार्यक्रमात अभिनेत्री फातिमा सना शेख आणि इमरान खान या कलाकारांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा :