मुंबई - 3 जानेवारी 2024 रोजी आयरा खान आणि तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत विवाह करणार आहे. या लग्नाबद्दल खान आणि शिखरे कुटुंबीय आनंदात आहेत. आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूर शिखरे यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इटलीमध्ये एंगेजमेंट झाली होती. आता लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसे लग्नाबाबतचे नवीन तपशील समोर आले आहेत.
जवळपास एक आठवडा बाकी असताना, आयरा आणि नुपूर यांनी त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात केली आहे आणि ते महाराष्ट्रीयन परंपरेनुसार ३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आमिर खान आपल्या मुलीच्या लग्नाने नवीन वर्षाची वाजत गाजत सुरुवात करणार आहे. कुटुंबातील माहितीनुसार, आयरा आणि नुपूर वांद्रे येथील भव्य ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये लग्नाच्या बंधनात अडकतील. 6 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान, ते एक नाही तर दोन रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. एक पार्टी दिल्लीत होईल तर दुसरी जयपूरमध्ये पार पडेल.
रिपोर्ट्सनुसार, आमिर आपल्या मुलीसाठी तिच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे . तो वैयक्तिकरित्या सिनेसृष्टीतील मित्रांना आणि समवयस्कांना लग्नाला उपस्थित राहून शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी कॉल करत आहे. बरेच कलाकार या दरम्यान सुट्टीमुळे शहरात नाहीत. मात्र, रिसेप्शन पार्टीला ते उपस्थित राहू शकतील असा तर्क आहे.
नुपूरची सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन या जोडप्याचे महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न होणार आहे. बहुतेक पारंपारिक दागिन्यांची खरेदी माटुंगा येथील एका प्रसिद्ध दुकानातून करण्यात आली होती.
नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर आणि आयरा एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर दोन्ही घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांचे हे नाते आता सहजीवनात रुपांतरीत होत असून 3 जानेवारीला ते बोहल्यावर चढतील.
हेही वाचा -