ETV Bharat / entertainment

आयरा खान आणि नुपूर शिखरेचा फ्लाइटमधील फोटो व्हायरल ; पाहा फोटो - नुपूर आणि आयराचा फोटो

Ira khan and nupur shikhare : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि तिचा पती नुपूर शिखरे हे उदयपूरला पोहचले आहेत. आता त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ira khan and nupur shikhare
आयरा खान आणि नुपूर शिखरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 2:18 PM IST

मुंबई - Ira khan and nupur shikhare : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान आणि तिचा पती नुपूर शिखरे सध्या त्याच्या लग्नामुळं चर्चेत आहेत. हे जोडपे त्याच्या शाही लग्नासाठी उदयपूरला पोहोचले आहेत. या लग्नासाठी आमिर खान आझादसोबत काल उदयपूरला रवाना झाला होता. दरम्यान आयरा आणि नुपूरचा फ्लॉईटमधील उदयपूरला जाताना एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आयरा आणि तिचा पती नुपूर शिखरे एकमेकांचा आधार घेऊन झोपलेले दिसत आहेत. आयरा आणि नुपूर या दोघांनीही सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आयरानं नुपूरच्या खांद्यावर डोके ठेवले असून दोघेही एकमेकांना बिलगून बसले आहेत.

Ira khan and nupur shikhare
आयरा खान आणि नुपूर शिखरे

आयरा-नुपरचं लग्न कधी? : 3 जानेवारी रोजी कुटुंबातील सदस्य आणि पाहुण्यांमध्ये नोंदणीकृत विवाह केल्यानंतर, हे जोडपे आता उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहे. या जोडप्याचं लग्न 8 जानेवारीला होणार आहे. या लग्नात मनोरंजन, क्रीडा, राजकारण आणि व्यवसायातील दिग्गज व्यक्ती हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर अनेक मोठे स्टार्सही या लग्नाला उपस्थित राहू शकतात. आयरा आणि नुपूरचा पुन्हा एकदा विवाहसोहळा साजरा होत आहे, ज्यामध्ये संगीत सेरेमनी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यानंतर हे जोडपे 8 जानेवारीला शाही शैलीत सात फेरे घेतील. यानंतर 13 जानेवारीला या जोडप्याचं रिसेप्शन मुंबईत होईल. या कार्यक्रमात बी-टाऊनचे स्टार्स दिसेल.

आयरा आणि नुपरचं लग्न होणार हटके अंदाजात : यापूर्वा आयरा आणि नुपरच्या कार्ट मॅरेजची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या फोटोत नुपूर हा जिमचे कपडे घातलेला दिसला होता, त्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होत. आयरा नुपूरच्या लग्नामधील काहीजणांना व्हिडिओ खूप आवडले होते. याशिवाय काही दिवसापूर्वी या जोडप्याच्या हळदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामधील सुंदर फोटो व्हायरल झाले होते. या जोडप्याचा हळदीचा कार्यक्रम खूप साध्या पद्धतीनं झाला. आता या कपलचं लग्न उदयपूरला महाराष्ट्रीयन पद्धतीनं होणार आहे.

हेही वाचा :

  1. अरबाज खान आणि पत्नी शुरा खानचा पाहा व्हिडिओ व्हायरल
  2. हॉलिवूड स्टार ख्रिश्चन क्लेपसरचा दोन मुलींसह विमान अपघातात मृत्यू
  3. अनन्या पांडेनं लक्ष वेधण्यासाठी 'थोड्या उशिराने' दाबले बेलचे बटन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.