पणजी ( गोवा ) - दिल दोस्ती दुनियादारी फिल्म या मालिकेतील अभिनेता सूव्रत जोशी यांनी मराठी चित्रपट महोत्सवात सहभाग नोंदवला. या मराठी चित्रपट महोत्सवात त्याचा गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट झळकणार आहे. त्या निमित्ताने त्याने बातचीत करत असताना गोव्यासोबत आपलं जवळचं नातं असून बॉर्डर वरील बांदा गावातच माझं बालपण गेलं त्यामुळे आपल्याला गोव्याची ओढ असल्याचं त्यांनी सांगितलं..
६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - यंदाच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ''गोष्ट एका पैठणीची'' या चित्रपटाने पटकावला आहे. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
वैशिष्ठ्यपूर्ण पैठणी - सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी... पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य... आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येण्या आधीच गोव्यातील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे.
स्वप्नांचा पाठलाग - प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. आशा निराशेने सजलेला स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो जणू एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातून देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला आता लवकरच येणार आहे.
हेही वाचा - Madhubala Biopic : बेकायदेशीर चरित्रपट बनवणाऱ्या निर्मात्याला मधुबालाच्या बहिणीचा कारवाईचा इशारा