हैदराबाद: कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023मध्ये यावर्षी अनेक बॉलिवूड अभिनेत्री सहभाग घेतला होता. त्यापैकी एक अभिनेत्री ही मृणाल ठाकूर देखील आहे. मृणाल ही पहिल्यांदाच या फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली होती. फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये मृणाल ठाकूरचा देखील समावेश आहे. तसेच मृणालने या फेस्टिव्हलमध्ये आपल्या सौदर्यांचा जादू रेड कार्पेटवर दाखवला होता. सर्वांचे लक्ष हे तिच्याकडे होते. कारण या कार्यक्रमात ती एका राजकुमारी सारखी दिसत होती. तिने या फेस्टिव्हलमध्ये काळ्या रंगाचा बॉडी सूट घातला आहे. त्यावर एक जॅकेट परिधान केले होते. या लूकमधील काही फोटो तिने इन्टाग्रामवर शेअर केली आहे. शिवाय तिचा तिसऱ्या दिवशीचा साडीमधील लूक फार सुंदर होता.
-
Mrunal hits yet again😍 pic.twitter.com/xS9ZyaWHrO
— . . . . . . (@_off_beat_) May 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mrunal hits yet again😍 pic.twitter.com/xS9ZyaWHrO
— . . . . . . (@_off_beat_) May 19, 2023Mrunal hits yet again😍 pic.twitter.com/xS9ZyaWHrO
— . . . . . . (@_off_beat_) May 19, 2023
मृणालने चाहत्यांना केले घायळ : मृणालने फाल्गुनी शेन पीकॉकने भरतकाम केलेली- शीमरी लेव्हेंडर -ह्रॅडलूम साडीची निवड केली होती, तसेच तिने यामध्ये फार साधा मेकअप केला होता आणि हेअरस्टाईलमध्ये तिने केस हे मोकळे सोडले होते. या लूकमध्ये ती फार देखणी दिसत होती. हा लूक तिने तिसऱ्या दिवशी केला होता. मृणाने या लूकचे देखील फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोवर अनेकांनी भरभरून कमेंट केल्या आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्यावर हृदय आणि फायर इमोटिकॉन्ससह कौतुकाचा वर्षाव केला. तसेच काहीजणांनी लिहले, 'मृणाल पुन्हा हिट आहे'. तर दुसऱ्याने लिहले की खूप खास दिसत आहे' आणखी एकाने लिहले, 'उफ्फ तू खूप स्टनिंग आहेस' असे तिचे कौतुक केले तर काही युजरने तिला 'नेक्स्ट नॅशनल क्रश' म्हटले आहे. तिच्या फोटोला अनेकजण लाईक करत आहे. नुकतेच मृणालने कान्स रेड कार्पेटवर पांढऱ्या फाल्गुनी शेन पीकॉक गाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर सुंदर दिसत होती. वन-शोल्डर गाउनमध्ये एका बाजूला रिस्क कटवे वैशिष्ट्ये आणि दुसऱ्या बाजूला त्रिमितीय रफल असलेला हा गाऊट फार सुंदर होता. ह्या लूक देखील ती आकर्षक दिसत होती.
मृणालने पदार्पणाबद्दल दाखवला उत्साह : एका पोस्टमध्ये तिने तिच्या कान्स पदार्पणाबद्दल लिहले 'ती यासाठी उत्साही असल्याचे सांगितले होते, 'मी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होताना रोमांचित आहे'. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर ग्रे गूजचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे. मी जागतिक चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधण्यासाठी, नवीन संधी शोधण्यासाठी आणि भारतीय चित्रपटांनी केले प्रतिभा प्रदर्शित बघण्यासाठी फार उत्सुक आहे.' मृणाल व्यतिरिक्त या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय, सारा अली खान, ईशा गुप्ता, उर्वशी रौतेला या देखील रेड कार्पेटवर झळकल्या होत्या.