ETV Bharat / entertainment

Narayan Murthy video : करीना कपूरच्या अहंकाराबद्दल नारायण मूर्तींनी सुनावले खडे बोल, व्हिडिओ पुन्हा व्हायरल - Kareena Kapoor

काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी यांनी अभिनेत्री करीना कपूरला चाहत्यांसोबत केलेल्या व्यवहाराबद्दल खडे बोल सुनावले होते. मात्र त्याच स्टेजवर त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी करीनाचे समर्थन केले होते. हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.

Narayan Murthy video
नारायण मूर्तींनी सुनावले खडे बोल
author img

By

Published : Jul 25, 2023, 7:13 PM IST

Updated : Jul 26, 2023, 11:30 AM IST

मुंबई - इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात मुर्ती यांनी अभिनेत्री करीना कपूरने चाहत्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दलचा संदर्भ दिला आहे. करोडपती असलेल्या मूर्ती यांच्या मते करीनाने अहंकारातून चाहत्यांना दुखवले होते. यावर्षीच्या सुरुवातीस कानपूर आयआयटीत बोलत असताना त्यांनी याबद्दलचे सविस्तर विधान केले होते. त्यानंतर त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी करीनाच्या तसे वागण्याचे समर्थन केले होते.

नारायण मूर्ती म्हणाले होते की एकदा लंडनहून भारतात परतत असताना त्यांच्यासोबत करीना कपूरही प्रवास करत होती. त्यावेळी अनेकजण तिला येऊन तिची विचारपूस करत होते. मात्र ती सर्वांकडे दुर्लक्ष करत होती. ही गोष्ट नारायण मुर्ती यांना खटकली होती. याउलट मूर्ती यांना भेटणाऱ्या प्रत्येकाशी ते सौजन्याने बोलत होते, हाय हॅलो स्वीकार करत होते. यावेळी त्यांची पत्नी स्टेवर उपस्थि होती. त्यांनी मूर्ती यांना अडवले व करीना खूप दमली होती, तिचे लाखो चाहते आहेत, त्यामुळे ती सर्वांशी बोलू शकत नव्हती, असे म्हणत तिचा बचाव केला होता.

आयआयटीतील विद्यार्थ्यांना अहंकार सोडण्याबद्दल सांगताना करीनाच्या वागण्याचे उदाहरण नारायण मूर्ती यांनी दिले होते. यावेळी बोलताना मूर्ती म्हणाले होते की, 'मी त्या दिवशी लंडनहून परत येत होतो, आणि माझ्या शेजारी करीना कपूर तिच्या सीटवर बसली होती. बरेच लोक तिच्या जवळ आले आणि हाय हॅलो म्हणाले. तिने उत्तर देण्याचा त्रास करुन घेतला नाही. हे पाहून मी थोडा आचंबीत झालो. माझ्याजवळ जे लोक येत होते त्यांच्याशी मी थोडावेळ उठून बोलत होतो. त्यांना तेवढीच अपेक्षा असते,' असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती कानपूर आयआयटीमध्ये बोलताना म्हणाले होते.

त्यांचे हे बोलणे त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांना पटले नाही. त्यावर त्या म्हणाल्या, 'तिचे लाखो चाहते आहेत. ती थकली असावी', त्या असे म्हणताच लोकांना हशा आणि टाळ्यांचा कडकडाट केला. त्यापुढे म्हणाल्या, 'मूर्ती एक संस्थापक आणि सॉफ्टेवअरमधील व्यक्ती आहेत. कदाचीत त्यांचे १० हजार चाहते असतील पण चित्रपट अभिनेत्रींना दहा लाख चाहते असतात.', असा सुक्तीवाद सुधा मुर्ती यांनी केला होता.

त्यावर मूर्ती म्हणाले होते की, 'ती अडचण नाही पण जेव्हा कोणी तुम्हाला आपुलकी दाखवते तेव्हा त्यांना प्रतिउत्तर देऊ शकता, हा माझा विश्वास आहे. हे सर्व तुमचा अहंकार कमी करण्याचे मार्ग आहेत.', असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा -

१. Krk : सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओलच्या बॉलिवूड पदार्पणानंतर केआरकेचे वादग्रस्त ट्विट

२. Vicky Kaushal : 'या' कारणासाठी विक्की कौशलने रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मधून घेतला माघार...

३. Viral 'diamond' Ring : तमन्ना भाटियाने उलगडले दोन कोटी किंमतीच्या 'हिऱ्या'च्या अंगठीचे रहस्य

Last Updated : Jul 26, 2023, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.