मुंबई : बॉलिवूड निर्माता करण जोहर हा चित्रपटसृष्टीत आपल्या चित्रपटांसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याने अनेक जबरदस्त चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याचे अनेक चित्रपट रूपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर झाले आहेत. करण जोहरसाठी २०२३ वर्ष खूप खास आहे. तो भारतीय चित्रपटसृष्टीत आपले २५ वे वर्ष साजरे करत आहे. हे वर्ष भव्य बनवण्यासाठी, इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) येथे सहभागी झाला असून या महोत्सवात सहभीगी होणाऱ्या निर्मात्यांच्या प्रतिभेला त्याने सलाम केला आहे. या निर्मात्यांच्या योगदानामुळे अनेक चित्रपट हे चित्रपटसृष्टीला मिळाले त्यामुळे त्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्ते केली आहे.
विशेष स्क्रीनिंग करणार : ११ ते २० ऑगस्टमध्ये चालणाऱ्या, शोकेस दरम्यान करण जोहर यांच्या सन्मानार्थ एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करून भारतीय चित्रपटसृष्टीतील विलक्षण योगदानाचे प्रदर्शन इथे करणार आहे. १९९८ मध्ये 'कुछ कुछ होता है' या सुपरहिट चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या करण जोहरने आपल्या आगळ्यावेगळ्या दृष्टी आणि कहानीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तेव्हापासून, करणचे चित्रपटसृष्टीत खूप मोठे नाव झाले आहे. त्याचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांना फार आवडतात. करणने भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे. उत्तम दिग्दर्शक म्हणून त्याने आपली जागा बॉलिवूडमध्ये बनवली आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' : करण जोहरला फक्त एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रचंड यश मिळवले नाही, तर निर्माता म्हणूनही खूप चांगले काम त्याने केले आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटांना जागतिक मान्यता देखील मिळाली आहे. याशिवाय त्याने अनेक नवोदित कलाकारांना लॉन्च केले आहेत. सहा वर्षांनंतर करण जोहर त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून दिग्दर्शकाच्या खुर्चीवर परतला आहे. या चित्रपटात रणवीर, आलिया भट्टशिवाय अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २८ जुलै रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या टिझरला प्रेक्षकांनी खूप जास्त पसंत केले आहे. तसेच या चित्रपटाचे गाणे देखील फार हिट झाले आहे.
हेही वाचा :
- Kiara Advani and Sidharth Malhotra : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला मुंबई विमानतळावर पापाराझीने केले स्पॉट...
- Prabhas first look from Project K : 'प्रोजेक्ट के'मधील प्रभासचा जबरदस्त लूक पाहून चाहते दंग
- Umesh Kamat and Priya Bapat : 'नवा गडी नवं राज्य'च्या दशकपूर्तीनंतर उमेश कामत आणि प्रिया बापट नवीन नाटकात पुन्हा एकत्र