हैदराबाद - एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म आणि सर्वोत्कृष्ट मूळ चित्रपटासाठी क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये दोन पुरस्कार मिळाले. चित्रपटाला मिळालेले हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे यश आरआरआर टीमसाठी उत्साह वाढवणारे होते. अमेरिकेच्या या यशस्वी दौऱ्यावरुन आरआरचे स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हैदराबादला परत आले आहेत. इथ परल्यानंतर त्यांनी चक्क बारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसोबत वेळ घालवल्याने चाहते खूश झाले आहेत. त्यांचे सोशल मीडियावरील फोटोंनी अक्षरशः धुमाकुळ घातला आहे.
-
Ah Range Veeru Saami🔥🙏
— Shiva Akunuri (@AkunuriShivaa) January 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
NTR with Indian Cricket Team!!#ManOfMassesNTR @tarak9999 pic.twitter.com/cKb6vLBMyg
">Ah Range Veeru Saami🔥🙏
— Shiva Akunuri (@AkunuriShivaa) January 16, 2023
NTR with Indian Cricket Team!!#ManOfMassesNTR @tarak9999 pic.twitter.com/cKb6vLBMygAh Range Veeru Saami🔥🙏
— Shiva Akunuri (@AkunuriShivaa) January 16, 2023
NTR with Indian Cricket Team!!#ManOfMassesNTR @tarak9999 pic.twitter.com/cKb6vLBMyg
राम चरण आणि ज्युनियर एनटीआर दोघेही 17 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये क्रिकेट संघातील काही व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी भेटले. संक्रांतीच्या सुट्ट्या असल्याने हे कलाकार सुट्टीच्या मुडमध्ये असतानाच काही क्रिकेटर्सनी त्यांना भेटण्याची विनंती केली आणि त्यांनी आनंदाने त्यांची भेट घेतली.
-
RC and NTR with cricket team pic.twitter.com/gJzHlZTNlv
— TwoodThalaiva (@tollywoodtaliva) January 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">RC and NTR with cricket team pic.twitter.com/gJzHlZTNlv
— TwoodThalaiva (@tollywoodtaliva) January 17, 2023RC and NTR with cricket team pic.twitter.com/gJzHlZTNlv
— TwoodThalaiva (@tollywoodtaliva) January 17, 2023
ज्युनियर एनटीआरने भारतीय क्रिकेट स्टार सूर्य कुमार यादव, इशान किशन, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर आणि शुभमन गिल यांची भेट घेतली. भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी हैदराबादमध्ये असून पहिला एकदिवसीय सामना १८ जानेवारी रोजी आहे. या निमित्ताने हैदराबादमध्ये आलेल्या क्रिकेटर्सना आरआरआर चित्रपटाच्या स्टार्सना भेटून आनंद झाला. त्यांनी ही भेट कुठे घेतली याचा तपशील कळू शकलेला नाही.
जेव्हा राम चरण आणि त्याचे वडील मेगास्टार चिरंजीवी क्रिकेट संघातील काही सदस्यांना भेटले तेव्हा अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याचा भाऊ अल्लू सिरिश हे देखील उपस्थित होते.