मुंबई - IND Vs PAK : क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. या सामन्यासाठी अनेकजण खूप उत्सुक आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. काही वेळानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये बॅट वॉर होताना दिसेल. दरम्यान आता मेगा-फाइटमध्ये सलमान खान हा त्याच्या 'टायगर 3' चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे. याशिवाय कंगना राणौतच्या 'तेजस' आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'च्या चित्रपटाचा टीझर या सामन्यादरम्यान प्रदर्शित केला जाणार आहे.
'टायगर 3' जाहिरात : सलमान खान सध्या स्टार स्पोर्ट्स चॅनलवर आहे. तो सध्या भारत आणि पाकिस्तान सामना आणि त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटाबद्दल चर्चा करत आहे. सलमान खान याठिकाणी टायगरच्या लूकमध्ये पोहोचला आहे. भाईजानच्या 'टायगर 3' चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता प्रदर्शित होणार आहे. या ट्रेलरसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटासाठी भारत आणि पाकिस्तान सामन्यात उड्डाण घेणार आहे. या सामन्यादरम्यान कंगना ही 'तेजस'चे प्रमोशन करणार आहे. कंगना स्टारर हा चित्रपट तेजस 20 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.
विकी कौशलचा 'सॅम बहादूर' : विकी कौशल स्टारर चित्रपट 'सॅम बहादूर'चा रोमांचक टीझरही भारत आणि पाकिस्तान सामन्या दरम्यान स्क्रीनवर दाखवला जाणार असल्याचं बोललं जात आहे. हा टीझर काल प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये विकी हा सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. मार्शल सॅम माणेकशॉ हे 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याचे लष्कर प्रमुख होते. सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल होते. या चित्रपटासाठी चाहते खूप आतुर आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023: सचिन तेंडुलकरसोबत अनुष्का शर्माचा फोटो व्हायरल; विराटसाठी बनणार चीअरगर्ल...
- Vrushabha Shoot : शनाया कपूरनं शेअर केला मोहनलाल आणि 'वृषभ' चित्रपटाच्या स्टार कास्टसोबत फोटो
- Rajkummar Rao And Patralekha : राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखाचा रोमँटिक व्हिडिओ झाला व्हायरल; पहा व्हिडिओ...